ओळखीचा फायदा घेत मुलाला जीवे मारण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार केल्याची घटना गुरूवारी (दि. २८) दुपारी कायनेटीक चौकातील एका लॉजवर घडली.
नगर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या पीडित विवाहितेने शनिवारी (दि. ३०) दिलेल्या फिर्यादीवरून अमीर हसन शेख (रा. शिक्रापूर ता. शिरूर, जि. पुणे) याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
अमीर शेख यांने फिर्यादीला २००८-०९ मध्ये प्रेमासाठी प्रपोझ केला होता. फिर्यादीने त्याला त्यावेळी नकार दिला होता. फिर्यादीचा २०१० मध्ये विवाह झाला. त्यानंतर २०२२ पर्यंत अमीर शेख हा फिर्यादीच्या संपर्कात नव्हता. ऑक्टोबर २०२२ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमांतून ते संपर्कात आले.
त्यांच्यात फोनवर बोलणे देखील होत होते.अमीरने फिर्यादीला बुधवारी (दि. २७) फोन करून गुरूवारी (दि. २८) दुपारी नगर शहरातील पुणे बसस्थानक येथे भेटण्याठी बोलावले होते. फिर्यादी त्यांच्या अल्पवयीन (वय ६) मुलाला घेऊन गुरुवारी दुपारी पुणे बस स्थानकावर गेल्या.
तेथे अमीर आला व त्यांनी एकत्रित चहा घेतला. त्यानंतर अमीर याने फिर्यादीला कायनेटीक चौकातील लॉजवर घेऊन जात मुलाला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे