Wednesday, April 17, 2024

पुणे बसस्थानकावर सांभाळून रहा, ७० हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले

७० हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले.
नगर – बसमधून लग्नासाठी निघालेल्या महिलेच्या पर्समधील ७० हजारांचे सव्वा दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविले. ही घटना सोमवारी (दि. १२) सकाळी पुणे बस स्थानक ते केडगाव दरम्यान घडली. कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. नितीन राम गायकवाड (वय ४५ रा. भिंगार) यांनी फिर्याद दिली आहे. १८ फेब्रुवारीला मुंबई येथे लग्न असल्याने फिर्यादीची पत्नी व दोन मुले यांना जायचे होते. फिर्यादी यांनी त्यांना सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पुणे बस स्थानकावर सोडून ते घरी गेले. फिर्यादीच्या पत्नीकडे पर्समध्ये पाऊण तोळ्याचे सोन्याचे डोरले व दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण होते. प्रवासा दरम्यान डोरले व गंठण चोरीला गेल्याचे समजले. त्याचा पतीने दुसर्‍या दिवशी कोतवाली पोलीसांकडे फिर्याद दिली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles