Monday, April 22, 2024

नगर-पुणे महामार्गावर भरधाव कंटेनरची धडक, एक ठार..

नगर-पुणे महामार्गावर महामार्गावर अपघाताची घटना घडली असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर एक गंभीर जखमी झाला आहे. अलिन उर्फ आलिम रफिक शेख (रा. अहमदनगर) असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर इम्रान रफिक शेख हे गंभीर जखमी झाले आहेत.

आज सकाळी नारायणगव्हाण शिवारातील नवले बस्ती जवळील हॉटेल समाधान जवळ पाठीमागून आलेल्या कंटेनर (क्रमांक सीजी ०७ बीआर ८३९७) ने पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षा (क्र. एमएच १६ एई २४२) ला पाठीमागुन जोराची धडक दिली.यात गाडीतील दोघेही जबर जखमी झाले व यात अलिम रफिक शेख याचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तो जागीच मृत पावला. तर इम्रान शेख गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच सुपा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत प्राथमिक पंचनामा करत जखमी इम्रान शेख यास खाजगी रुग्णालयात दाखल केले. कंटेनर चालक फरार झाला असून कंटेनर ताब्यात घेतला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles