Wednesday, April 30, 2025

नगर-पुणे वाहतूक मार्गात रविवार ते मंगळवार दरम्यान बदल…

नगर : भीमा कोरेगाव (पेरणे, पुणे) येथील शौर्य स्तंभाला अभिवादन करण्यासाठी १ जानेवारी २०२४ रोजी नागरिकांची गर्दी होणार असल्याने नगरहून पुण्याकडे जाणारी व बेलवंडी फाटा (ता. श्रीगोंदा) येथून पुण्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. ही वाहतूक आता पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. हा बदल दि. ३१ डिसेंबरच्या रात्री १२ ते दि. २ जानेवारीच्या सकाळी ६ पर्यंत लागू असणार आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले आहेत. नगर-पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी बेलवंडी फाटा-देवदैठण- पिंपरी कोलंदर- उक्कडगाव- बेलवंडी- नगर दौंड महामार्गावरून लोणी व्यंकनाथ- मढेवडगाव- काष्टी- दौंड- सोलापूर-पुणे महामार्ग मार्गे पुण्याकडे असा मार्ग असणार आहे. तर नगरकडून सरळ पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी कायनेटीक चौक- केडगाव बाह्यवळण रस्ता- अरणगाव बाह्यवळण रस्ता- कोळगाव- लोणी व्यंकनाथ- मढेवडगाव- काष्टी- दौंड- सोलापूर पुणे महामार्ग मार्गे पुण्याकडे असा मार्ग असणार आहे.

याशिवाय नगरकडून पुणेमार्गे मुंबई, नवी मुंबई, ठाण्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी कल्याण बाह्यवळण- आळेफाटा- ओतुर- माळशेज घाट असा मार्ग असणार आहे. वाहतूक बदलाचा हा आदेश शासकीय वाहने, शौर्य स्तंभाला अभिवादनासाठी जाणाऱ्या नागरिकांची वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन बंब, अत्यावश्यक कारणास्तव स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नाही.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles