नागपुर हिवाळी अधिवेशनात पुण्यातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावरील लक्षवेधीत वडगावशेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी नगर रस्ता सिग्नल फ्री करण्यासाठी बैठक घेण्याची मागणी केली होती. मंत्री उदय सामंत यांनी ही बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शनिवार पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार सुनिल टिंगरे, आयुक्त विक्रम कुमार, पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, एनएचआयचे वरिष्ठ अधिकारी अभिजित आवटे, वाहतूक पोलिस सहआयुक्त श्री खाडे उपस्थित होते.
बैठकीत नगर रस्त्यावरील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी एनएच आयच्या माध्यमातून शिरूर ते वाघोलीपर्यंत जो दुमजली उड्डाणपुल प्रस्तावित आहे. तो थेट विमाननगर- रामवाडीपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यात आलाय अशा सूचना एनएच आयला करण्यात आले. तसेच शास्त्रीनगर चौकातील कोंडी सोडविण्यासाठी याठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग ( ग्रेड सेपरेटर) उभारण्यात येणार असून त्यासंबंधीची निविदा प्रक्रिया तातडीने राबविण्यात यावी असे आदेश पालकमंत्री पवार यांनी महापालिका आयुक्तांना दिले.