Wednesday, February 28, 2024

राहुरीत वकील दाम्पत्याची हत्या, पाच जणांना बेड्या, वकील संघटनेचा बेमुदत बंदचा इशारा

जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील मानोरी येथील राजाराम आढाव व मनीषा आढाव या वकील पती पत्नीचे अपहरण करून खून केल्याची घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. खंडणीसाठी केलेल्या या हत्या प्रकरणातील 5 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले असून वकील संघटना मात्र वकील संरक्षण कायदा करण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाली असून अहमदनगर जिल्ह्यातील कामकाज बंद ठेवत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुरी तालुक्यातील मनोरी येथील आढाव वकील दाम्पत्य 25 जानेवारीला दोघेही राहुरी कोर्टात गेले. मात्र घरी परतलेच नाही. राजाराम जयवंत आढाव (52) व मनिषा राजाराम आढाव (42) हे दोघे घरी न आल्याने 26 जानेवारीला राहुरी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने मानोरी ते राहुरी जाणारे रोडवरील तसेच राहुरी कोर्ट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व वकिल दांम्पत्याकडे कोणकोणत्या आरोपींचे वकिलपत्र आहेत याबाबत माहिती घेतली.

या घटनेनंतर वकील संघटना आक्रमक झाल्या आहेत. वकील संरक्षण कायदा करावा ही मागणी अनेक वर्षांपासून पूर्ण होत नाही व त्यातच अशा प्रकारच्या घटना उघडकीस येत असल्याने नगर जिल्ह्यातील वकील संघटनांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. 2 तारखेला फडणवीस यांच्या भेटीत वकील संरक्षण कायद्याविषयी मार्ग न निघाल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा अहमदनगर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष नरेश गुगळे यांनी दिला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles