Friday, January 17, 2025

Ahmednagar crime: अज्ञात तरुणाची निर्घृण हत्त्या करून मृतदेह पिंपात टाकला

राहुरी तालुका पुन्हा एकदा एका अज्ञात तरुणाच्या निर्घृण हत्येमुळे हादरला आहे. बारागाव नांदूर शिवारातील मुळा धरणाच्या डाव्या कालव्यालगत अंदाजे ३५ वर्षीय तरुणाचा पाण्याच्या छोट्या पिंपामध्ये पाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. बारागाव नांदूर गावातील मुळा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या डाव्या कालव्यालगत एका तरुणाचे डोके पाण्याच्या छोट्या पिंपामध्ये आणि पिंपाबाहेर दोन्ही पाय दोरखंडाने बांधलेल्या स्थितीतील मृतदेह निदर्शनास आला.

रविवारी सकाळी शेताकडे जात असताना पटेल यांना या परिसरात उग्रवास आला. त्यांना पाहणी केली असता कालव्याच्या कडेला असलेल्या झुडूपात एका १०० लीटरच्या प्लास्टिक ड्रममध्ये एका मृतदेह दिसून आला. एका प्लास्टिक ड्रममध्ये अंदाजे ३० ते ३५ वर्षीय तरूणाचा नायलॉन दोरीच्या सहाय्याने हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. मृतदेह फुगल्याने तो ड्रममध्ये अडकला होता. पोलीस प्रशासनाने ड्रम कापून मृतदेह बाहेर काढला. त्यावेळी मृत व्यक्तीच्या अंगावर अनेक प्राणघातक वार केल्याचे दिसून आले.

मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. त्यांनी याबाबत माहीती जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे यांना मोबाईलवरून कळविली. गाडे यांनी याबाबत त्वरीत पोलीस प्रशासनाला महिती दिली. त्यानुसार श्रीरामपूरचे अपर पोलीस आधिक्षक वैभव कुलूबर्मे, उपविभागीय पोलिस आधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेत घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.

या दररम्यान नगर येथील ठसे तज्ज्ञ पथक व श्वान पथकाने घटनास्थळी येऊन आरोपींचा माग घेण्याचा प्रयत्न केला; मात्र दुपारपर्यंत कोणताही सुगावा हाती लागला नाही. अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नाही. तरुणाचा खून करून मृतदेह त्या ठिकाणी आणून टाकला असावा, असा अंदाज पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला. मृतदेह कोणाचा आहे, कुठला आहे, त्याचा खून करणारे कोण, कोणत्या करणातून त्याचा खून केला. हे सर्व गुलदस्त्यात आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles