Tuesday, September 17, 2024

Ahmednagar….वन विभागाच्या कर्मचाऱ्याने घरात घुसून केला महिलेचा विनयभंग…

राहुरी तालुक्यातील घोरपडवाडी येथे मेंढपाळ महिलेच्या पालात घुसून विनयभंग करणार्‍या वन विभागाच्या कर्मचार्‍यास चार दिवसांत अटक करून कारवाई न केल्यास 16 ऑगस्ट रोजी सकल धनगर समाजाच्यावतीने राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. राहुरी तालुक्यातील घोरपडवाडी शिवारात 11 ऑगस्ट रोजी दुपारच्या दरम्यान वन विभागाचा कर्मचारी आरोपी सागर वाकचौरे हा एका मेंढपाळ महिलेच्या पालात घुसला. त्यानंतर त्याने पीडित महिलेचा विनयभंग केला. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात सागर वाकचौरे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

16 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता शेळ्या मेंढ्यांसह मेंढपाळ बांधव व सकल धनगर समाज नगर-मनमाड रस्त्यावर चक्काजाम आंदोलन करणार असल्याचा इशारा ज्ञानेश्वर बाचकर यांनी दिला आहे. यावेळी राहुरी येथील वन विभाग कार्यालयाच्या आवारात धनगर बांधवांनी ठिय्या मांडून आरोपी सागर वाकचौरे याला सेवेतून निलंबित करण्याची मागणी केली.

यावेळी यशवंत सेना जिल्हाप्रमुख विजय तमनर, बाजार समितीचे संचालक रामदास बाचकर, राष्ट्रवादी युवा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर बाचकर, शेतकरी संघटनेचे सुरेश लांबे, ओबीसी सेलचे अध्यक्ष भागवत झडे, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानचे सदस्य दत्तात्रय खेडेकर, भारत मतकर, दत्तात्रय बाचकर, अनिल डोलणार, सरपंच मैनाबापू शेंडगे, उपसरपंच रेवणनाथ करमड, हरिभाऊ हापसे, कुरणवाडीचे सरपंच काशिनाथ डव्हन, उपसरपंच सुनील खिलारी, शिवाजी खिलारी, नानासाहेब करमड तसेच कुरणवाडी, घोरपडवाडी, चिंचाळे, गडदे आखाडा, बारागाव नांदूर पंचक्रोशीतील मेंढपाळ बांधव उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles