Saturday, May 18, 2024

बुधवारपासून श्री संत कृष्णाजी बाबा महाराजांचा सप्ताहास सुरुवात

बुधवारपासून श्री संत कृष्णाजी बाबा महाराजांचा सप्ताहास सुरुवात
सोनगाव- पंचक्रोशीचे आराध्य दैवत श्री संत कृष्णाजी बाबांचा चौदावा वार्षिक महासप्ताह एक मे बुधवारपासून सुरू होत असून या सप्ताह मध्ये महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांचा कीर्तन महोत्सव आयोजित केला आहे. या सप्ताह निमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण, काकडा भजन, हरिपाठ, अखंड विना वादन, किर्तन असे अनेक कार्यक्रम आयोजित केले आहे. या सप्ताह निमित्त बुधवारी एकमेव सकाळी दहा वाजता महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार, प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे कीर्तन आयोजित केले असून रोज सायंकाळी सात ते नऊ या वेळेत कीर्तन महोत्सव होणार आहे.
या कीर्तन महोत्सवामध्ये ह. भ.प ज्ञानेश्वर महाराज पवणे जामखेड, हभप रामेश्वर महाराज कंठाळे नेवासा, ह भ प अर्जुन महाराज चौधरी नांदुरखी, रामायणाचार्य मनोहर महाराज सिनारे, ह भ प सुमित महाराज गोरे, ह भ प शितलताई साबळे, ह भ प गणेश महाराज शिंदे शिवनेरी, यांचे कीर्तन होईल व आठ मे रोजी सकाळी दहा वाजता परमपूज्य गुरुवर्य महंत स्वामी प्रकाशानंद गिरी महाराज, श्रीक्षेत्र देवगड, यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.
हा सप्ताह जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असून अनेक दानशूर भाविक तसेच अन्नदाते या सप्ताहमध्ये मोठे योगदान देत असतात. सायंकाळी किर्तन संपल्यानंतर अनेक अन्नदात्यांनी पण तिच्या महाप्रसादाच्या आयोजन केले आहे .या कीर्तन महोत्सवास भावी भक्तांनी उपस्थित राहून कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री कृष्णाजी बाबा तरुण मंडळ,प्रवरा तालीम संघ, एकलव्य तरुण मंडळ, छत्रपती युवा मंच, सावता तरुण मंडळ, महात्मा फुले प्रतिष्ठान, सम्राट प्रतिष्ठान, हनुमान तरुण मंडळ माऊली तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles