नगर जिल्ह्यातील राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट उमेदवार देणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील भट्टड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सुनील भट्टड यांनी महायुतीमध्ये शिरूर मतदारसंघाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला नगर जिल्ह्यातील राहुरी, नगर, पारनेर, श्रीगोंदा, कोपरगाव, अकोले या जागेवर उमेदवार दिले जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीत राहुरी मतदार संघात सुजय विखे यांना मताधिक्य मिळाले आहे. अगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाकडून जाहीर झालेला उमेदवार हा हमखास विजयी होईल. महायुती सरकारने आणलेल्या मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेसंदर्भात उप मुख्यमंञी अजित पवार यांचा नगर जिल्हा दौरा असून या दौऱ्यात शरद पवार गटाची अनेक नेतेमंडळी पक्ष प्रवेश करणार असल्याचाही दावा सुनील भट्टड यांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राहुरीसाठी मिळणाऱ्या निधीतील कामे दर्जेदार होतील, ही खबरदारी घेतली जाणार आहे. गेल्या सात वर्षाच्या कालावधीत राहुरी शहरातील रस्त्याची अवस्था दयनीय झाली असल्याने रस्ता मजबुतीकरण कामासाठी 50 कोटी रूपयांचा निधी मिळावा ही मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राहुरी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली आहे.