सोनगाव- सोनगाव पंचक्रोशीचे आराध्य दैवत, जागृत देवस्थान श्री संत कृष्णाजी बाबा महाराज यांची सालाबाद प्रमाणे भरणारी यात्रा बुधवार आणि गुरुवारी 17 व 18 जानेवारी रोजी संपन्न होत आहे. सोनगाव व प्रवरा परिसरातील सर्वात जुनी व ग्रामीण भागातील यात्रा म्हणून अनापवाडीची यात्रा प्रसिद्ध आहे. लोणी, कोल्हार यानंतर अनापवाडी येथील यात्रा मोठी भरते. बाबांच्या दर्शनासाठी जिल्ह्यातून व पर जिल्ह्यातून अनेक भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात. तसेच अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यावर बाबांचा नवसपूर्ती करतात. यात्रेनिमित्त यात्रा कमिटीच्या वतीने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आला आहे. बुधवारी पहाटे पाच वाजता गोदाजलाने जलाभिषेक होईल. दुपारी बारा वाजता छबिना मिरवणूक, आठ वाजता मनाच्या काठ्यांची मिरवणूक व रात्री नऊ वाजता महाराष्ट्रातील गाजलेले वगनाट्य विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांचा लोकनाट्य तमाशा होईल. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता कलावंतांच्या हजेरीचा कार्यक्रम व दुपारी चार वाजता महाराष्ट्रातील नामवंत पैलवानांच्या कुस्त्यांचा जंगी हंगामा होणार आहे.
यावर्षी कृष्णाजी बाबा तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नोकरदार मुलांकरून वर्गणी गोळा करून बाबांच्या मंदिर व सभा मंडपाच्या रंग कामाचे जवळपास तीन लाखांचे काम पूर्ण केले असून कृष्णाजी बाबांच्या मंगल कार्यालयाचे वॉल कंपाउंडचे जवळपास साडेचार लाखांचे काम पूर्णत्वाला नेले आहे.
या यात्रेमध्ये परिसरातील सर्व माहेरवासीनी व भाविक भक्त येऊन यात्रेत खरेदीचा खरेदीचा आनंद घेतात. या यात्रेतील हलवाईंच्या खाऊ साठी परिसरात प्रसिद्ध आहे. यात्रेनिमित्त सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा व यात्रा खरेदीचा लाभ घ्यावा, असे यात्रा कमिटीचे वतीने आवाहन करण्यात आले आहे.
सोनगाव बुधवारी व गुरुवारी कृष्णाजी बाबांचा यात्रोत्सव…
- Advertisement -