शेतकऱ्यांचा उभा गहू भूईसपाट : शेतकरी हतबल
वांबोरी परिसरात वादळासह गारपिठीचा तडाखा
अहमदनगर ( प्रतिनिधी ) – ऐन थंडीत वांबोरी (ता. राहुरी ) परिसरात मंगळवार (दि. २४ ) रोजी रात्री आठच्या सुमारास जोरदार वादळासह गारपीठ झाली. या वाद आणि गारपिठीत गहू, हरभरा कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले.
सुमारे २० ते ३० मिनीट गारांसह मुसळधार पाऊस झाला. यामुळे निसावून उभा असणारा गव्हाचे पिक भूईसपाट झाले. आधीच परतीच्या पावसाने या भागातील खरीपाच्या पिकांचे मोठे नुकसान झालेले असतांना त्याची भरपाई शेतकरच्या पदरी पडलेली नसतांना आता पुन्हा रब्बी पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतकरी आता आसमानी संकटापुढे हतबल झाला आहे. शासनाने झालेल्या गारपीठीचा पंचनामा करावा अशी मागणी होत आहे.