नगरमध्ये सलग दुसऱ्या रात्री पावसाची जोरदार बॅटिंग…वीज गायब, सखल भाग पाण्याखाली

0
866

बुधवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. ठिकठिकाणी झाडे पडली, वीज पुरवठाही खंडित झाला. गुरूवारी दुपारपर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. पडलेली झाडे तातडीने बाजुला करण्याचे काम महापालिकेच्या उद्यान विभागाने मध्यरात्रीपासून हाती घेतले ते गुरूवारी दिवसभर सुरू होते.

नगर: बुधवारी रात्री नऊच्या सुमारास अचानक वारा आणि त्या पाठोपाठ जोराचा पाऊस सुरू झाला. यानंतर काही वेळातच वीजपुरवठा खंडित झाला. जोराचा वारा आणि पाऊस यामुळे वाहन चालकांची तारांबळ उडाली. काही वेळातच शहरातील दिल्लीगेट, प्रोफेसर कॉलनी चौक, पटवर्धन चौक आदी सखल भागात तलावाचे स्वरूप आले. घराबाहेर असलेले रात्री उशीरापर्यंत अडकून पडले. जोराचा वारा असल्याने त्याचा फटका झाडांना बसला.

बुरूडगाव रस्त्यावरील चौकात मोठे झाड कोसळले. रस्त्यावरच झाड कोसळल्याने वाहतुकीलाही अडकाठी निर्माण झाली. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच महापालिका उद्यान विभागाचे प्रमुख शशिकांत नजान यांनी मध्यरात्री आपल्या कर्मचार्‍यांसह घटनास्थळी जात कोसळलेल्या झाडाच्या फांद्या कापून रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला.