Sunday, February 9, 2025

नगरमध्ये स्वस्त धान्य दुकानांतून नागरिकांना प्लास्टिक मिश्रित तांदूळ…जीवाशी खेळण्याचा प्रकार

नगर : शहरातील स्वस्त धान्य दुकानदारांकडून पांढऱ्या तांदळाचा काळा बाजार सुरु असून देशमुख गल्ली व दिल्लीगेट परिसरातील स्वस्त धान्य दुकान क्र २ आणि ३० दुकानातनिकृष्ट दर्जाचे तांदूळ स्वस्त धान्य दुकानदारांकडून लाभार्थ्यांना वितरित करण्यात येत असून त्या मध्ये प्लास्टिक तांदूळ तुकडे मिक्स करून नागरिकांना दिले जाते व त्यांच्या आरोग्याशी खेळण्याचे काम स्वस्त धान्य दुकानदार करत आहे, याबाबत लाभार्थी महिलांनी माझ्याकडे येत तक्रार केली, लाभार्थ्यांकडून हाताचे ठसे घेतले जातात मात्र तीन तीन चार चार महिने स्वस्त धान्य वितरित केलेच जात नाही यामुळे लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ येत आहे, चांगला तांदूळ न देता खराब, कचरा प्लास्टिक मिश्रित तांदूळ नागरिकांना वितरित करण्यात आहे हा निकृष्ट तांदूळ अन्नधान्य वितरण अधिकारी तहसीलदार सपना भोईटे यांना नागरिकांनी कार्यालयात जाऊन भेट दिला तरी स्वस्त धान्य दुकानदारांवर तातडीने कारवाई करत स्वस्त धान्य दुकानदारांकडून काळा बाजार थांबवावा अशी मागणी भाजपचे पदाधिकारी अजय चितळे यांनी केली
अन्नधान्य वितरण अधिकारी तहसीलदार सपना भोईटे यांना नागरिकांनी निकृष्ट तांदूळ भेट दिले यावेळी अजय चितळे, सुनील शिंदे, श्रीपाद वाघमारे, अमित पाखले, गणेश आटोळे आदींसह महिला नागरिक उपस्थित होते,

सरकार कडून स्वस्त धान्य दुकानदारांना लाभार्थ्यांना वाटण्यासाठी चांगल्या दर्जाचे धान्य येत असते, मात्र संबंधित दुकानदारांकडून या धान्यात भेसळ करत चांगल्या तांदळात प्लास्टिक तांदूळ मिक्स करण्याचा प्रकार स्वस्त धान्य दुकानदार करत मनमानी कारभार करत लाभार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहे, स्वस्त धान्य दुकानदारांच्या या कृत्यामुळे सरकारविषयी नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे असे मत भाजपचे पदाधिकारी अजय चितळे यांनी व्यक्त केली.

Related Articles

1 COMMENT

  1. एकदम मुर्खपणाची बातमी आहे असे पत्रकार ठेवले तर लोक जोड्याने हाणतील! हे तांदूळ पोषण मुल्य वर्धक आहेत फॉलीक ॲसिड, आयर्न, असे घटक एकत्र करून ते मिक्स केलेले आहेत! दोन वर्षांपासून ते रेशनमध्ये येतात! सरकारने सर्व वृत्तपत्रांमध्ये याची माहिती दिली आहे. जरा चौकशी करा. अर्धवट बातमी आणि लगेच सरकार दोषी!

Comments are closed.

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles