Wednesday, February 28, 2024

आ.संग्राम जगताप यांचा पाठपुरावा….नगर शहर होणार खड्डेमुक्त…

नगर : अहमदनगर शहर खड्डे मुक्त करण्याचे काम सुरू असून रस्ता कॉंक्रिटीकरणासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असते, यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू असून शहरांमधील बहुतांश भागामध्ये रस्ता कॉंक्रिटीकरणाची कामे पूर्ण झाली आहे. यामध्ये टिळक रोड, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळी रस्ता, परमपूज्य आनंदऋषीजी महाराज मार्ग, स्वस्तिक चौक, कोठी रस्ता, बालिकाश्रम रोड, केडगाव लिंक रोड, सोलापूर रोड, कानडे मळा, सीएसआरडी कॉलेज पर्यंतच्या रस्ता कॉंक्रिटीकरणाची कामे मार्गी लावली आहे. आदींसह विविध भागातील कॉलनी अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण व डांबरीकरणाची कामे पूर्ण झाले आहे. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते माळीवाडा वेशीपर्यंतच्या शिवजयंती मार्ग वरील रस्ता कॉंक्रेटीकरणाचे काम सुरू होणार आहे. दिल्ली गेट न्यू आर्टस कॉलेज, पत्रकार चौक हा रस्ता सावेडी उपनगराला जोडणारा महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या खड्ड्यामुळे नागरिकांना प्रवास करत असताना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो यासाठी महापालिकेच्या माध्यमातून या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरण यासाठी राज्य शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा सुरू असून, निधी प्राप्त होताच दोन्ही बाजूने आरसीसी गटार, फुटपाथ व काँक्रिटीकरणाचा दर्जेदार रस्ता निर्माण करू, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.

न्यू आर्टस कॉलेज ते अप्पू हत्ती चौक पर्यंतच्या रस्ता पॅचिंग कामाची पाहणी आमदार संग्राम जगताप व आयुक्त डॉ.पंकज जावळे यांनी केली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर,प्राध्यापक माणिकराव विधाते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते प्राध्यापक अरविंद शिंदे, शहर अभियंता मनोज पारखे, यशवंत तोडमल, शुभम भुतारे आदी उपस्तित होते

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles