नगर – शहरातील डांबरीकरणाचे रस्ते पावसाच्या पाण्यामुळे वारंवार खराब होऊन मोठ-मोठे खड्डे पडले जायचे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. रस्त्यांचा कायमस्वरूपी चा प्रश्न मार्गी लागावा यासाठी महायुती सरकारकडे गेल्या दोन वर्षापासून पाठपुरावा केला. त्यामुळे डीपी रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामासाठी मोठा निधी प्राप्त झाला. शहरातील सर्वच भागात रस्त्याची कामे सुरू असून जुने आरटीओ ऑफिस रस्ता अत्यंत खराब झाला होता या परिसरात मोठी लोक आहे पुढील वीस वर्षाचे नियोजन करून कामे सुरू असून काम करीत असताना विविध अडचणी निर्माण होत आहे. यामध्ये लाईटचे पोल,पिण्याच्या पाण्याच्या लाईन, जुन्या गटारी आहेत. त्या स्थलांतरित करण्यासाठी वेळ लागत आहे तसेच रस्ता कॉंक्रिटीकरणाचे कामे करीत असताना खोदून करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन कामे करीत असताना अडचण निर्माण होत असेल पण दोन महिने त्रास सहन करा पुढील अनेक वर्ष त्रास होणार नाही. तरी नगर शहराच्या विकासासाठी नागरिकांनी सहकार्य करावे ही विनंती मी करत आहे. आपण सर्वजण मिळून विकास कामातून शहराचा काय पालट करू असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
जुने आरटीओ ऑफिस रस्ता कॉंक्रिटीकरण कामाची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली. यावेळी इंजिनिअर श्रीकांत निंबाळकर, ठेकेदार एजन्सी आदी सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जुने आरटीओ ऑफिस रस्ता कॉंक्रिटी करण्याचे काम सुरू असून या ठिकाणावरून मोठा नाला वाहत आहे यावरती 900 एम एम चे पाईप टाकले जाणार असून नाल्याची स्वच्छता करण्यात येईल. नागरिकांनीही सुरू असलेल्या कामाची माहिती घेऊन देखरेख करावी असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
दोन महिने त्रास सहन करा पुढील अनेक वर्ष त्रास होणार नाही…
- Advertisement -