Thursday, July 25, 2024

घटनेच्या दिवशी कुटुंबासह बाहेरगावी; सचिन कोतकर यांचा खुलासा

नगर (प्रतिनिधी)- व्यावसायिक व राजकीय हेतूने नाव खराब करण्याच्या उद्देशाने हॉटेलच्या दोन कर्मचाऱ्यांमधील वैयक्तिक वादातून दाखल झालेल्या गुन्ह्यात नाव गोवण्यात आले असल्याचा खुलासा उद्योजक तथा हॉटेल व्यावसयिक सचिन कोतकर यांनी केला आहे. तर घटनेच्या दिवशी कुटुंबासह बाहेरगावी असताना याप्रकरणात गोवले गेल्याचे स्पष्ट करुन या प्रकरणाचा सखोल तपास करुन उच्चस्तरीय अधिकारी नेमण्याची मागणी कोतकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.
उदयनराजे पॅलेस व यश पॅलेस हे हॉटेल एकमेकांच्या समोरासमोर आहे. 2 जुलै रोजी यश पॅलेसचा मॅनेजर राकेश कुमार सिंग व उदयनराजे पॅलेस मध्ये काम करणारा प्रिन्सकुमार सिंग यांनी वैयक्तिक वादातून एकमेकांवर गुन्हे दाखल केले. त्यामध्ये कुठल्याही प्रकारे संबंध नसताना माझे नाव गोवले असल्याचे कोतकर यांनी म्हंटले आहे.
या घटनेच्या दरम्यान तीन ते चार दिवसापासून कुटुंबियांसमवेत बाहेरगावी असताना व या गुन्ह्याशी कुठलाही संबंध नसताना राजकीय लोकांनी या घटनेचे भांडवल करुन नाव खराब करण्याच्या उद्देशाने गुन्ह्यात नाव गोवण्याचे काम केले आहे. फक्त व्यावसायिक स्पर्धेतून व त्रास देण्याच्या हेतूने हा प्रकार घडला आहे. राकेश कुमार सिंग हा उदयनराजे पॅलेस येथे चार वर्षांपूर्वी कामास होता. त्याला चार वर्षांपूर्वीच कामावरून काढून टाकण्यात आलेले आहे. 2021 पासून आज पर्यंत त्या व्यक्तीशी कोणतेही बोलणे अथवा कोणत्याही प्रकारे संपर्क झालेला नाही. त्या व्यक्तीस शिवीगाळ करण्याचा प्रश्‍न उद्भवत नाही व कोणत्याही प्रकारे कोणाला शिवीगाळ करण्यात आलेली नाही. उदयनराजे पॅलेस हॉटेल माझ्या मालकीची असल्यामुळे व प्रिन्स कुमार सिंगला कामावरुन काढून टाकण्यात आलेले असताना त्याने या गुन्ह्यात नाव गोवले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. तर याप्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

व्यावसायिक स्पर्धा ही निकोप असावी. विरोधक व्यवसायात सक्षम होत नसल्याने नाव खराब करण्याचा उद्योग केला जात आहे. संदीप उद्योग समूहाने संपूर्ण महाराष्ट्रात ब्रँड निर्माण केला असून, नाव खराब करण्याचा खटाटोप स्पर्धक हॉटेल व्यावसायिक करत आहे. सेवा जमत नसल्याने व हॉटेल व्यवसाय चालत नसल्याने सूडबुद्धीने गुन्हा नोंदवला गेला असून, त्याला राजकीय वळण देऊन कोतकर कुटुंबाचे नाव खराब करण्याचे काम सुरु आहे. -सचिन कोतकर (उद्योजक तथा हॉटेल व्यावसायिक)

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles