Saturday, January 18, 2025

रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ नगरमध्ये मोर्चा,नितेश राणे म्हणाले ‘मी हिंदूंचा गब्बर, चालायला लागलो तर लोकं दारं बंद करतात

अहमदनगर : मी चालायला लागलो तर लोकं दारं बंद करतात, मी हिंदूंचा गब्बर आहे, असे वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केले आहे. महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ आणि बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने अहमदनगरमध्ये भाजप नेते नितेश राणे यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिक येथील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनाच्या दरम्यान एका धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याविरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आली. तर काही ठिकाणी रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चे काढण्यात येत आहे. आज अहमदनगरमध्ये रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. यावेळी कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

या मोर्चात नितेश राणे म्हणाले की, माझा इतिहास सर्वांना माहिती आहे. दाऊद इब्राहिमला आव्हान देणाऱ्यापैकी हे राणे कुटुंबीय आहे. बाकी कोणातच हिंमत नव्हती. माझे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा 63 एन्काऊंटर करण्याचा आदेश देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा मी मुलगा आहे. हिंमतीने सर्व करा, कुणी काय इथे करू शकत नाही. आपल्या जिभेला काही हाड नाही. पाहिजे तेव्हा मी बोलतो त्यांच्यासमोर मी जाऊन बोलतो मला पाहून दरवाजे खिडक्या बंद करतात जसं काय गब्बर आलाय मी पण हिंदूंचा गब्बर आहे हे लक्षात ठेवा, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles