Wednesday, February 28, 2024

‘साकळाई’ योजनेच्या भूमीपूजनाचे काय झाले?, कृती समितीचा रेल रोको आंदोलनाचा इशारा

नगर : साकळाई उपसा सिंचन योजनेच्या आराखड्याला अंतिम मंजुरी देऊन कामाचे कार्यारंभ आदेस द्यावेत, या मागणीसाठी ‘साकळाई’ जलसिंचन योजना कृती समितीने नगर व श्रीगोंदा तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. समितीच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना निवेदन दिले. समितीचे पदाधिकारी बाबा महाराज झेंडे, भापकर गुरुजी, संतोष लगड, नारायण रोडे, चिखलीचे सरपंच राजेंद्र झेंडे, रामदास भेंडे, सोमनाथ धारमे, संतोष रायकर, पुरुषोत्तम लगड, डॉ. योगेंद्र खाकाळ, कुलदीप कदम आदींच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. निवेदनात म्हटले की, गेल्या २५-३० वर्षांपासून साकळाई उपसा जलसिंचन योजनेसाठी शेतकऱ्यांचा संघर्ष चालू आहे. साकळाई योजनेचा सर्व्हे पूर्ण झालेला असून ७९४ कोटींचा आराखडा तयार झाला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यामान उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजित विखे, आमदार बबनराव पाचपुते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले या सर्वांनी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर योजनेला मंजुरी देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याचे आश्वासन दिले होते.

येत्या ८ दिवसात आराखड्याला मंजुरी देऊन निधी वर्ग करावा अन्यथा दि. १४ फेब्रुवारीला चिखली (श्रीगोंदा), रुईछत्तीसी (नगर) येथे दि. १६ रोजी व दि. २५ रोजी दौंड रस्त्यावरील रेल्वे रुळावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा नेत्यांच्या विरोधात नसून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी रोहिदास उदमले, बाळासाहेब नलगे, लालासाहेब करपे, गोवर्धन कारले, शिवाजी नारायण विधाटे, भाऊसाहेब बाळासाहेब काळे, शिवाजी गणपत झेंडे, जयराज लगड, अमोल लंके, संभाजी रामचंद्र झेंडे, राजाराम घुटे, विलास रणसिंग,बापू झेंडे, रावसाहेब काळे मामा, तुकाराम काळे आदी उपस्थित होते

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles