संदीप मिटके आर्थिक गुन्हे शाखेचे नवे उपअधीक्षक
अहमदनगर : शिर्डी उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांची आर्थिक यांची गुन्हे शाखेत नेमणूक करण्यात आली आहे. ते, मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेचा पदभार स्वीकारणार आहेत.
मिटके यांची शिर्डी येथून नाशिक शहरात सहायक पोलीस आयुक्तपदी बदली झाली होती. तेथून त्यांची बदली आता आर्थिक गुन्हे शाखेत झाली आहे. आधीचे पोलिस उपअधीक्षक कमलाकर जाधव यांची नाशिकला बदली झाली होती. त्यामुळे गृह शाखेचे उपअधीक्षक हरीष खेडकर यांच्याकडे आर्थिक शाखेचा अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला होता. सोलापूर येथील संजय बांबळे यांची आर्थिक गुन्हे शाखेत नेमणूक झाली होती, तसा आदेशही निघाला होता, मात्र सोमवारी रात्री पोलिस उपअधीक्षक मिटके यांच्या नियुक्तीचा आदेश निघाला. मिटके मंगळवारी पदभार घेणार आहेत. त्यांच्यासमोर नगर अर्बन बँक कर्ज घोटाळ्याच्या तपासाचे मोठे आव्हान असणार आहे.