Saturday, October 5, 2024

‘पद’ म्हणजे नेमके काय? शिवसेनेचे संदेश कार्ले यांच्या विशेष लेखाची चर्चा…

*पद म्हणजे काय अतिशय सुंदर लेख लिहिला आहे* . *सगळ्या समाजाला आरसा दाखवणारा लेख आहे.* 🔸 *कोणत्याही क्षेत्रातील पद म्हणजे सहकाऱ्यांनी त्या क्षेत्रात समूह हितासाठी उपलब्ध करून दिलेली संधी व काटेरी मुकुट असतो. कोणत्याही माणसाचे महत्त्व हे पद मिळवल्यामुळे कधीच वाढत नाही. तर तो त्या पदाला किती न्याय देतो. तो किती कार्यक्षम, कर्तुत्व,नेतृत्व दाखवतो यावर त्याचे खरे व्यक्तिमत्व समाजाला समजते. कर्तृत्वच नसेल आणि पद मिळाल्यामुळे अहंपणा, स्वार्थपणा, लबाडी व गर्व चढला असेल तर कालांतराने निश्चितच त्याचा गर्व खाली होतो. पदामुळे तात्पुरते महत्त्व वाढते. पण चांगल्या कर्तुत्वामुळे आयुष्यभर महत्त्व राहते. पदामुळे आपल्यावर असलेली जबाबदारी व्यवस्थित वेळ देऊन पार पाडली पाहिजे. चांगली माणसं सहकारी बरोबर घेऊन त्या क्षेत्रात यश मिळवले पाहिजे. ज्यांनी तुमच्यासाठी त्याग केला आहे. त्यांची जाणीव निरंतर व कायमच ठेवली पाहिजे. व्यक्ती जेंव्हा समाजात जितक्या उंचीवर पोहोचतो ती निव्वळ त्याच्या कर्तुत्वामुळे नव्हे, तर त्या व्यक्तीच्या सोबत असलेल्या बऱ्याच लोकांनी केलेला त्यागाचा सुद्धा त्यात महत्त्वाचा वाटा असतो. म्हणून संबंधितांनी आपल्या स्वतःला मोठा म्हणण्यापेक्षा आपल्याला मोठे करणारी आपली माणसं मोठी असतात याची जाणीव ठेवून वागलेले बरं. ज्या पायरीचा साहारा घेऊन आपण पुढची पायरी गाठली आहे. त्या पाहिला कधीच विसरू नये. कारण त्या पायरीला आधार घेतला नसता तर आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नाही. लक्षात असू द्या पण क्षणभंगुर असते. पण पद गेल्यावरही आपली किंमत कायम राहीली पाहिजे ‌ असे माणसांशी वागले पाहिजे. नाहीतर हाच समाज तुमच्या कार्यक्षमता, कर्तुत्व, वागणं, प्रामाणिकता व बोलणं पहात असतो, एकत असतो. आणि सहनही करत असतो. मात्र लबाडीपणा वाढला तर योग्य वेळी धडा शिकवतो,? की तिथं तुमची किंमत रसातळाला जाऊन शून्य होते. म्हणूनच आपल्या माणसांशी, समाजाशी व विश्वासू मित्रांशी, नीट वागा, नीट बोला व आपले कर्तुत्व निस्वार्थी व चांगले आहे हे सिद्ध करा. तरच लोक तुमच्या सोबत राहतील, जो दुसऱ्यांना मान देतो, मुळातच तो स्वतः सन्माननीय असतो. कारण माणूस दुसऱ्यांना तेच देऊ शकतो, जे त्याच्या जवळ असते, मनाचा मोठेपणा हा गुण आहे. जो पदांनी नव्हे तर संस्कारांनी प्राप्त होतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीने पद आहे म्हणूनच काम केले पाहिजे अस नाही, पद हे आपण मागून नाहीतर आपल्या लोकांनी, समाजाने दिले पाहिजे. तरच त्या कर्तुत्वाला मान सन्मान मिळतो. पद म्हणजे मी कोणी मोठा आहे हे ज्या दिवशी मनात येईल त्या दिवसापासून आपली उत्तरती काळा सुरू झाली हे समजून जा, यामुळे पदाचा गर्व टाळून पदाला न्याय मिळेल असेच काम करा. म्हणूनच पद म्हणजे अतिशय सुंदर लेख सगळ्या समाजाला आरसा दाखवणारा लेख आहे सर्वांना धन्यवाद.*

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles