Wednesday, April 17, 2024

सध्या कोण कधी अन केव्हा कोणत्या पक्षात आहे हे कळायला मार्गच नाही… संदेश कार्ले यांची मार्मिक पोस्ट

नगर (सचिन कलमदाणे): सध्या महाराष्ट्रातील राजकारणात इतके बदल होत आहेत की सर्वसामान्य माणूस पार चक्रावून गेला आहे. कोण कधी कोणाशी आघाडी, युती करेल, कोण कधी पक्ष बदलेल हे ब्रम्ह देवही सांगू शकत नाही. कालपर्यंत एकनिष्ठ राहण्याची शपथ घेणारे सकाळी दुसऱ्याच नेत्याच्या चरणी निष्ठा अर्पण करतात. या रंग बदलू पणामुळे कार्यकर्ते, सामान्य नागरिकांची तारांबळ उडते. अगदी गावागावात हे लोण पसरले आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदेश कार्ले यांनी सोशल मीडियावर असाच एक अनुभव शेअर केला आहे.

संदेश कार्ले यांनी म्हटले आहे की,
काल सकाळी एका मित्राच्या आईच्या दशक्रिया निमित्ताने गेलो त्या ठिकाणी निवेदकाने श्रध्दानजली अर्पण करणाऱ्या बऱ्याच प्रतिनिधींचे नावे पक्षाच्या असणाऱ्या पदासह घेतली परंतु काही नाव घेतांना त्यांनी फक्त माजी म्हणून उल्लेख केला पक्षाच्या पदाचा उल्लेख केला नाही त्यावर एका कार्यकर्त्याला राग आला आणि त्यांनी माजी सह ते कोणत्या पक्षाचे प्रतिनिधी आहेत याचा उल्लेख करणे गरजेचे आहे व निवेदक कसा चुकला हे दाखवण्याचा प्रयत्न केला त्यात दुसऱ्या पदाधिकार्यांचा पक्षाचा उल्लेख करताना तो आठ दहा दिवसांपूर्वी असणाऱ्या पक्षाचा उल्लेख केला गेला निवेदकाने त्याची चूक सुधारून ते सध्या त्या पक्षात नाहीत तर ह्या पक्षात आहेत असे सांगितले त्या बरोबरच सर्व लोक म्हणाले सध्या कोण कधी अन केव्हा कोणत्या पक्षात आहे हे कळायला मार्गच नाही अशातच प्रवचनकार हि पुटपुटले कोण कोठे आणि कोणत्या पक्षात आहे आणि राहील याची खात्रीच नाही त्या दुःखाच्या कार्यक्रमातही खूप मोठा हशा झाला ,,,,,,
पक्ष बदलणारे लगेच म्हणाले असल्या दुःखाच्या क्षणी हसणे योग्य नाही ,,,,,
पण लोक चर्चा करत होते हे निर्लज्ज आहेत ,,सध्या अवघड आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles