Saturday, July 12, 2025

Ahmednagar accident: कारची मोटारसायकलला धडक; दोघे जखमी तर कार जळून खाक

संगमनेर-भरधाव वेगाने जाणार्‍या कारने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये मोटारसायकलवरील दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि. 15 जुलै) संगमनेर तालुक्यातील खांडगाव परिसरात घडली. अपघातानंतर ही कार पेटलेल्या अवस्थेत शहर पोलिसांना आढळली.

याबाबत समजलेली माहिती अशी, की पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खांडगाव शिवारातील उड्डाणपुलाच्या जवळून पुण्याहून संगमनेरच्या (Pune Sangamner) दिशेने भरधाव वेगाने कार (क्र. एमएच.14, एफएक्स. 2736) जात होती. कारचालकाने समोरून जाणार्‍या मोटारसायकलला (क्र. एमएच.17, सीवाय.2112) धडक दिली. या मोटारसायकलवर अक्षय लक्ष्मण पवार (रा. रायतेवाडी) आणि धीरज गुंजाळ (रा. खांडगाव) हे दोघे जात होते. या अपघातामध्ये हे दोघे जखमी झाले. अपघातानंतर कार पलट्या घेऊन थेट उसाच्या शेतात जाऊन कोसळली. अपघातानंतर कारचालक संकेत सुनील ढोले (रा. घोडेकर मळा) हा कार सोडून पळून गेला.

याबाबत मोटारसायकल चालक अक्षय पवार याने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कारचालक संकेत ढोले याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच सहायक पोलीस पनिरीक्षक विश्वास भान्सी पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संगमनेर (Sangamner) नगरपालिकेच्या अग्निशमक दलाला पाचारण केले. त्यानंतर ही कार विझवण्यात आली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles