रस्त्याची कामे होईपर्यंत थोड्या दिवस त्रास सहन करा मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो – आ. संग्राम जगताप
नगर शहरात रस्त्यांची कामे सुरू झाली असून पूर्ण होईपर्यंत काही दिवस नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागेल, कॉंक्रिटीकरण्याची रस्त्याची कामे असल्यामुळे ती नियोजनबद्ध व दर्जेदार व्हावीत यासाठी खोदाई केली जाईल व दोन्ही बाजूंनी पावसाचे पाणी व ड्रेनेज वाहून जाण्यासाठी आरसीसी गटात तयार करण्यात येणार आहे यामुळे नागरिकांना थोडासा त्रास होईल मात्र पुढे कायमस्वरूपीचा त्रास बंद होणार आहे यापूर्वी अनेक वर्ष रस्त्यांच्या समस्येमुळे शहरवासीयांनी त्रास सहन केला आहे रस्त्याची कामे होईपर्यंत थोड्या दिवस सहन करा मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो, विकास कामांमध्ये नगरकर मोठ्या संख्येने सहभागी होत असून विकासाची कामे पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी प्रतिपादन केले