Sunday, July 14, 2024

नगरमध्ये क्लासवरून घरी चाललेल्या अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून लुटले…

नगर : अल्पवयीन मुलीला दोन बुरखाधारी व्यक्तींनी भररस्त्यात सकाळी लुटल्याची घटना सावेडी उपनगरातील गावठाण परिसरात घडली. यासंदर्भात सतरा वर्षांच्या मुलीने तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मुलगी खासगी शिकवणी वर्ग सुटल्यानंतर मैत्रिणीला भेटण्यासाठी जाताना, तोंडाला काळी मुखपट्टी लावून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी रस्त्यात अडवून लुटले.

या मुलीकडील मोबाईल व कानातील दोन ग्रॅमच्या सोन्याच्या रिंग बळजबरीने काढून घेतल्या. बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास सावेडी गावठाणातील पंपिंग स्टेशन रस्त्यावर, कराळे हेल्थ क्लबजवळील ओढ्याजवळ ही घटना घडली. अल्पवयीन मुलगी सारसनगरच्या चिपाडे मळ्यात राहते. पंपिंग स्टेशन रस्त्यावरील ओढ्याजवळ मागून दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तीने तिच्या दुचाकीला त्यांची दुचाकी आडवी लावली. पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने मुलीकडे पैशाची मागणी केली. तिने पैसे नसल्याचे सांगताच त्या दोघांनी मोबाईल व कानातील दोन ग्रॅमच्या सोन्याच्या रिंगा बळजबरीने काढून घेतल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles