अहमदनगर – टेलिग्राम या सोशल मिडीया साईटवर अश्लील फोटो व मेसेज पाठवून एका २० वर्षीय महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या युवतीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित टेलिग्राम खातेधारक युवकावर नगरच्या सायबर पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि.२२) दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी युवती ही राहुरी तालुक्यातील एका गावात राहात असून तिच्या टेलिग्राम खात्यावर दि.१५ डिसेंबर रोजी जगदीश नावाच्या टेलिग्राम खातेधारक व्यक्तीने अश्लील मेसेज, स्टीकर व फोटो पाठविले. ते पाहून त्या युवतीला लज्जा उत्पन्न झाल्याने तिने कुटुंबियांशी चर्चा करून तिने शुक्रवारी नगरच्या सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी टेलिग्राम धारक जगदीश नावाच्या व्यक्ती विरोधात भा.दं.वि.कलम ३५४ (अ)(ड) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६७ व ६७ (अ)नुसार गुन्हा दाखल केला आहे.