सेतू कार्यालयाकडून विद्यार्थी व नागरिकांची विविध दाखल्यांसाठी आर्थिक लूट
मनविसेनेची तहसीलदार यांच्याकडे निवेदनातून कारवाईची मागणी
नगर : शहरातील सेतू कार्यालयात विवीध दाखले काढण्यासाठी विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या प्रमाणात कामा निमित्त येत असतात गेल्या काही दिवसांपासून कार्यालय परिसर आणि कार्यालयात आर्थिक फसवणुकीचे प्रकार खुप वाढले आहेत तश्या तक्रारी मनविसेकडे प्राप्त झाल्या आहेत.
विविध दाखल्यांसाठी, आधार केंद्रातील कामांसाठी जे शासकीय दर आहेत त्या पेक्षा अव्वाचे सव्वा दर आकारले जात आहेत यातही तफावत म्हणजे कुणाकडून कमी तर कुणाकडून जास्त रक्कम घेतली जात आहे यातून सर्व सामान्य नागरिकांची आर्थिक लूट होत आहे, विद्यार्थी वर्ग मोठ्या अपेक्षेने आपल्याकडे येतात आणि त्यांची जर तुमच्या समोरच फसवणूक होत असेल तर तुमच्या बद्दल आणि तुमच्या खुचीं बद्दल आदर जनमाणसांत राहणार का ? ही फसवणूक जर तात्काळ थांबली नाही तर आम्हाला जो कोणी मनुष्य या फसवणुकीत सापडेल त्याच्या तोंडाला काळं फासून धिंड काढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. या घटनेला थांबवायचे असेल तर प्रत्येक आधार केंद्रातील कामाचे, विविध दाखल्यांसाठी चे शासकीय दरपत्रक तात्काळ कार्यालय आवारात लावावा आणि संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी मनविसेनेचे सुमित वर्मा यांनी नायब तहसीलदार अनिल तोरडमल यांच्याकडे निवेदनातून केली. यावेळी जिल्हाध्यक्षा श्रद्धा खोंडे, प्रकाश गायकवाड, संकेत जरे आदी उपस्थित होते,
नायब तहसीलदार अनिल तोरडमल यांनी शिष्टमंडळास सांगितले की शहरातील सेतू केंद्र चालकांची बैठक लावून त्यांना सेतू केंद्रात शासकीय दरपत्रक लावण्याच्या सूचना दिल्या जाईल असे आश्वासन यावेळी दिले.