Saturday, January 18, 2025

शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक युवकाचे पलायन, गुंतवणूकदारांकडून तोडफोड… नगर जिल्ह्यातील प्रकार

शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील लाडजळगाव सह परिसरातील अनेक गुंतवणुकदारांना चुना लावत एका शेअर मार्केट चालवणाऱ्या ट्रेडिंग व्यवसायीकाने पलायन केल्याची घटना तालुक्याच्या पुर्व भागात नुकतीच बुधवार दि. १० रोजी पहाटे घडली असुन आर्थिक घात झाल्याने संतप्त गुंतवणुकदारांनी त्याच्या कार्यालयाची फोडतोड केली आहे. काही महिन्यापूर्वी असेच दोघे-तिघे फरार झाले त्यामुळे आता विश्वासघात झालेले ठेवीदार हाय मोकलत आहेत. शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात अनेक शेअर ट्रेडिंग व्यवसाय कार्यालये थाटली गेली आहेत. भरघोस मिळणाऱ्या व्याजाच्या अभिलाषाने अनेकांनी आपले सोने, जमिनी, आदी मालमत्ता गहान ठेऊण तर काहींनी आपली मालमत्ता विकुन विश्वासाच्या आधारे यामध्ये लाखो रुपयांची गुंतवणुक केली आहे.

गुंतवणुक करणाऱ्यात शेतकरी, मजुर, नौकरदार, व्यापारी, राजकीय पुढारी यांच्यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. ५० हजारापासुन २५ लाख व त्यापुढेही शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक करणारे काही महाभाग आहेत. गत महिन्यात शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील दोन ते तीन शेअर ट्रेडिंग व्यावसायीक कोट्यावधी रुपये बुडवुन पळून गेले त्यावेळी गुंतवणुकदारात खळबळ उडाली. याच धास्तीने काहींनी गुंतवणुक केलेली रक्कम परत घेण्याचा तगादा सुरु केला त्यामुळे एका शेअर ट्रेडिंग व्यवसायीकाने विषारी औषध घेतल्याची घटना घडली होती. मुद्दलही गेले आणी व्याजही गेले तरीही याबाबत गुन्हा दाखल करण्यास कुणीच धजावत नाही याची खंत अनेकांना सतावत असताणाच बुधवारी पहाटे पुर्व भागातील आणखी एक शेअर ट्रेडिंग व्यावसायीक अनेकांना चुना लावुन पळून गेल्याने पुन्हा एकदा गुंतवणुकदारांत खळबळ उडाली आहे.

बुधवारी सकाळी सदर गावातील गुंतवणुकदारांना शेअर ट्रेडिंग घेणाऱ्या व्यक्तीच्या घरास व कार्यालयास कुलुप असल्याचे दिसुन येताच त्यांना अंदाज आला आणी गावात कुजबुज सुरू झाली अनेकांनी अधिक चौकशी करण्याचा प्रयत्न केला तर ट्रेडिंग धारकास मोबाईलद्वारे संपर्क केला मात्र त्याचा आणी त्याच्या बरोबर असणाऱ्या इतरांचा मोबाईल बंद असल्याचे लक्षात आल्याने तो पळून गेल्याचा संशय आला. ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे गुंतवणुकदारांत संताप निर्मान झाला या संतप्त गुंतवणुकदारांनी सदर ट्रेडिंग व्यावसायीकाच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles