ढाकणे पॉलिटेक्निकचा उन्हाळी परीक्षा २०२४चा ९२ टक्के निकाल
शेवगाव – राक्षी ता. शेवगाव येथील कै. सौ. सुनिताताई एकनाथराव ढाकणे पॉलिटेक्निक कॉलेज, शेवगाव या तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उन्हाळी परीक्षा २०२४मध्ये दैदिप्यमान यश संपादित केले आहे. प्रथम वर्ष अभियांत्रिकीचा निकाल ९३.६०% तर द्वितीय वर्षाचा निकाल ९१.१२% तर तृतीय वर्षाचा निकाल ९३.३०% लागला असल्याची माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. श्रीकांत ढाकणे यांनी दिली आहे. प्रथम वर्षातील नाटकर साक्षी राजेंद्र ही विद्यार्थीनी ७६.८२% गुणांसह प्रथम आली असून द्वितीय वर्षातून आंधळे महेश दादासाहेब या विद्यार्थ्याने ७९.१४% गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला आहे तर तृतीय वर्षातून शेवाळे तिर्थराज आबासाहेब हा विद्यार्थी ७६.११% गुणांसह प्रथम आला आहे. १६ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून ३५८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तंत्रनिकेतनचा एकंदर निकाल ९२ टक्के लागला आहे.
ढाकणे पॉलिटेक्निकचा उन्हाळी परीक्षा २०२४चा ९२ टक्के निकाल
- Advertisement -