अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा करिष्मा पाहायला मिळाला. या ठिकाणी विद्यमान भाजप आमदार मोनिकाताई राजळे यांना चांगलाच धक्का बसला आहे. सर्वात जास्त ग्रामपंचायत निवडणुका असलेल्या 27 जागांपैकी भाजपाला फक्त सहा जागांवर समाधान मानावे लागले आहे.
तर अजित पवार गटाला बारा आणि सर्वपक्षीय स्थानिक विकास आघाडीला नऊ जागा मिळाल्या आहेत. तरी बऱ्यापैकी या ठिकाणी राष्ट्रवादीला मानणारे कार्यकर्ते आहेत, त्यामुळे शेवगाव तालुका पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या मागे असल्याचं सिद्ध झालं आहे.