ढाकणे शैक्षणिक संकुल शेवगाव येथे नवीन इंजीनियरिंग कॉलेजला मान्यता :
केदारेश्वर ग्रामीण विकास प्रतिष्ठान संगमनेर संचलित, ढाकणे शैक्षणिक संकुल राक्षी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2024- 25 पासून समाजभूषण एकनाथराव ढाकणे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग सुरू होतआहे. सदरील महाविद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल विद्यापीठ लोणेरे आणि महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग मुंबई व ए. आय. सी. टी. इ. नवी दिल्ली मान्यताप्राप्त असून सदरील महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी या वर्गाला प्रवेश देणे सुरू आहे तरी सर्व अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सदरील महाविद्यालयाचा ऑप्शन कोड भरणे कामी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. एकनाथराव ढाकणे साहेब, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्रीकांत ढाकणे साहेब यांनी आवाहन केलेले आहे. सदरील संस्था 2010 वर्षापासून राक्षी या ठिकाणी तंत्रशिक्षणाचे पदविका अभ्यासक्रमाचे शिक्षण उत्तम प्रकारे देत सोबतच समर्थ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे इलेक्ट्रिकल, वायरमन, फिटर, वेल्डर इत्यादी ट्रेड यशस्वीपणे सुरू आहेत. सदरील विविध अभ्यासक्रमांद्वारे परिसरातील विद्यार्थ्यांचा जिवनस्तर उंचावण्या कामी कार्यरत आहे, तरी परिसरातील आणि आसपासच्या तालुक्यातील सर्व इंजिनीयर होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयाचा ऑप्शन कोड भरणे कामी आवाहन करण्यात येत सदरील महाविद्यालयाचा कोड DTE Code 05370 असा आहे.
समाजभूषण एकनाथराव ढाकणे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग शेवगाव मु./पो. राक्षी या कॉलेज करिता बारावीनंतर डिग्री इंजिनिअरिंग साठी मुलांचे विद्यार्थ्यांचे ऑप्शनफॉर्म भरणे प्रक्रिया सुरू झालेली आहे.
➡️ कॉम्प्युटर इंजीनियरिंग
➡️ सिव्हिल इंजिनिअरिंग
➡️ मेकॅनिकल इंजिनिअरिंग
➡️ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
➡️ आर्टिफिशल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स इंजीनियरिंग
या पाच कोर्सेस करिता डिग्री प्रवेशासाठी’ ढाकणे शैक्षणिक संकुल ‘ ,राक्षी, शेवगाव या ठिकाणी संपर्क करावा असे आवाहन विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.
ढाकणे शैक्षणिक संकुल शेवगाव येथे नवीन इंजीनियरिंग कॉलेजला मान्यता
- Advertisement -