शेअर मार्केटच्या नावाखाली दोन कोटी पंच्चाहत्तर लाख रुपयांचा गंडा घालणारा आरोपीसˆ पोलीसांनी सापळा लावुन केले जेरबंद
फिर्यादी नामे- बबन आण्णासाहेब शिरसाठ वय- 30 वर्षे, धंदा- शेती रा.नविन खामपिंप्री ता.शेवगाव जि.अहमदनगर यांचे फिर्यादीवरुन शेअर मार्केट ट्रेडिंग कंपणी नामे- CDG इनव्हेस्टमेंट नावाचे शेअर मार्केट ट्रेडींग नावाचे आँफीस आंतरवली खुर्द ता.शेवगाव जि.अहमदनगर येथे कंपनीच्या नावाखाली एकुण- 2,75,00,000/- रुपयांची फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करुन फसवणुक झाल्याचे फिर्यादीत नमुद केल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शेवगांव पोलीस स्टेशन गु.र.नं- 685/2024 भादवि कलम -420,409,406,34 प्रमाणे दिनांक-12/08/2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मा.पोलीस निरीक्षक समाधान नागरे शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, नमुद गुन्ह्यातील आरोपी नामे- छत्रपती परमेश्वर विघ्ने वय- 24 वर्षे, रा.आंतरवली बु. ता.शेवगाव जि.अहमदनगर हा शेवगाव शहरामधील गाडगे महाराज चौक येथे येणार असल्याची गुप्त बातमी पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना मिळाल्याने त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवुन दोन पोलीस पथके नेमुण सदर ठिकाणी सापळा रचण्यात आला होता. नमुद गुन्ह्यातील आरोपी हा रात्री सुमारे 02/15 वाचे सुमारास एका ट्रक मधुन खाली उतरुन अँटो रिक्षामध्ये पळुन जात असतांना पोलीस पथकाने त्यास मोटार सायकलवर पाठलाग करुन त्यास आखेगाव रोड येथील वरुर चौक येथे ताब्यात घेवुन त्यास शेवगाव पोलीस स्टेशन येथे आणुन नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. वरिल आरोपी विरुध्द इतर कोणीही व्यथीत अगर बळीत अशा जनतेची फसवणुक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोस्टेला बिनधास्तपणे संपर्क साधावा असे याव्दारे आवाहन करण्यात येत आहे.
सदरची कारवाई ही मा.पोलीस अधिक्षक श्री राकेश ओला सो अहमदनगर, मा.अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे अहमदनगर, मा.उपविभागिय पोलीस अधिकारी श्री सुनिल पाटील सो उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.श्री समाधान नागरे, सपोनि धरमसिंग सुंदरडे, पोसई भास्कर गावंडे, पोकॉ शाम गुंजाळ, पोकॉ संतोष वाघ, पोकॉ प्रशांत आंधळे, पोकॉ संपत खेडकर, पोकाँ राहुल खेडकर, पोकाँ बप्पासाहेब धाकतोडे तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोकाँ राहुल गुड्डु यांनी केली असुन वरिल गुन्ह्यांचा तपास सपोनि धरमसिंग सुंदरडे हे करत आहेत.