Saturday, May 18, 2024

देशात फक्त नरेंद्र मोदींची गॅरंटी… कॉग्रेसचा जाहिरनामा म्हणजे फसवणूक…

शेवगाव: काँग्रेसने जाहीर केलेला जाहीरनामा हा केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलीली धुळफेख असून केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी हा जाहिरनामा प्रकाशित केला अशी बोचरी टीका अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि भाजप महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केली आहे. शिंगोरी गावात बूथ सक्षमीकरण संवाद मेळावा आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

शेवगाव तालूक्यातील शिंगोरी गावातील बुथ कमिटी बैठक आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार मोनिका राजळे यांच्यासह शेवगाव तालूक्यातील सर्व भाजप पदाधिकारी,बुथ कमिटी मेंबर, गण प्रमुख आणि सुपर वॉरियर उपस्थित होते. यावेळी खासदार विखे पाटील बोलत होते.

खा. विखे म्हणाले, क्राँग्रेसने आपल्या जाहिरनाम्याचे नाव ‘न्यायपत्र’ दिले आहे. जर काँग्रेसला आता न्याय द्यायचा आहे, तर ५५ वर्षाच्या काळात केवळ अन्याय केला आहे का? अनेक दशक देशात काँग्रेसने सत्ता उपभोगली अनेक लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहिरनामे प्रकाशित केले. पण आजतयागत त्यांनी आपल्या जाहिरनाम्यातील एकही आश्वासन पुर्ण केले नाही. केवळ निवडणुकीच्या तोंडावर आश्वासनाचे गाजर दाखवत लोकांची फसवणूक करण्याचे काम आतापर्यंत काँग्रेस करत आली आहे.

यामुळे हा जाहिरनामा केवळ कागदापूरता मर्यादित असून पुन्हा देशाचे पंतप्रधान हे केवळ नरेंद्र मोदीच होतील, देशात केवळ मोदींची गॅरेंटी टीकू शकणार आहे. असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. मागील दहा वर्षाच्या काळात देशाने जगात जे नावलौकीक मिळविले ते केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच, मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश महासत्तेकडे वाटचाल करत असून देशात आर्थिक सुधारणांना गती मिळत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles