लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवार दि.४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघ व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, एमआयडीसी, नागापूर, अहमदनगर येथे सकाळी ८ वाजेपासून सुरू होणार आहे. या मतमोजणीसाठी सुमारे एक हजार पाचशे अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून मतमोजणीसाठी सर्व निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक शाखेने दिली आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून डॉ. सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांच्यात लढत आहे. तर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून सदाशिव लोखंडे आणि महाविकास आघाडीकडून भाऊसाहेब वाकचौरे यांच्या लढत आहे. अहमदनगर आणि शिर्डी लोकसभेतून कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.