Monday, March 4, 2024

नगर शहरात शिवसेना नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत अनेकांनी बांधले शिवबंधन

अहमदनगर (प्रतिनिधी) : शिवसेना उप जिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ३०० हुन अधिक कार्यकर्त्यांनी
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या हाताने शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
येथील नक्षत्र लॉन येथे रविवार दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १ वाजता शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ता खा. संजय राऊत हे आले होते. या निमित्ताने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, स्व. आ. अनिल भैय्या राठोड आणि शिवसेना उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांना मानणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधून घेतले. आणि भगवा पंचा परिधान करून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी व्यासपीठावर शिवसेना नगर दक्षिण संपर्क प्रमुख आ. सुनील शिंदे, शहर प्रमुख संभाजी कदम, महापौर सौ. रोहिणी संजय शेंडगे, उप जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, युवा सेना प्रदेश सह चिटणीस विक्रम राठोड, शिवसेनेचे नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी अशोक पारधे, रुपेश गायकवाड, साजिद सय्यद, अमोल पाडळे, अन्सार शेख, पोपट रोकडे, राजू शिंदे, प्रकाश गाडे, सचिन साळवे, सागर रोकडे, सागर पारधे, संतोष साळवे, सोनू सय्यद आदी कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला.
शिवसेनेचं विचार आणि तत्त्व आपल्याला पटलेले असून संजय राऊत यांनी सांगितल्या प्रमाणे आ. अनिल भैय्या राठोड यांच्या प्रमाणे आपण पक्षात राहून पक्षाची ध्येय धोरणे राबवू, पक्ष तळागाळापर्यंत *नेण्याचा प्रयत्न करू तसेच पक्ष वाढीसाठी प्रयत्न करू असा निश्चय या कार्यकर्त्यांनी केला आहे.
खा. संजय राऊत हे नगर शहराच्या दौऱ्यावर येत असल्याचे समजताच गिरीश जाधव यांनी नगरमधील तळागाळातील गोर गरीब जनतेची मदत करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण करून त्यांना पक्षात घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले. विविध भागात त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या आणि त्यांना पक्षाची ध्येय धोरणे आणि उद्देश समजावून सांगितला. आणि त्यांना पक्षात घेण्यासाठी त्यांचे मन वळवले. त्यांच्या या प्रयत्नाना आलेले यश पाहता या कार्यकर्ता मेळाव्याला गिरीश जाधव समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खा. संजय राऊत, संपर्क प्रमुख आ. सुनील शिंदे यांनी गिरीश जाधव यांच्या पक्ष वाढीच्या कार्याची जाहीर पणे आणि खाजगी चर्चेत विशेष प्रशंसा केली.
नगर शहर व जिल्ह्यात शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण आपला जास्तीत जास्त वेळ देणार असून या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्नरत राहून संजय राऊत यांनी आपल्या भाषणात दिलेल्या आदेशानुसार नगर शहरासह जिल्ह्यात ३ ते ४ आमदार निवडून आणणारच असा निर्धार त्यांनी केला आहे.*

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles