बोल्हेगाव व मंगलगेट भागातील युवकांचा शिवसेनेत प्रवेश
अविनाश भिंगारदिवे यांची बोल्हेगाव विभागप्रमुखपदी व अक्षय भिंगारे यांची उपशहरप्रमुखपदी नियुक्ती
शहरात नव्या दमाने शिवसेनेची बांधणी सुरु -सचिन जाधव
अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवसेना (शिंदे गट) पक्षात बोल्हेगाव व मंगलगेट भागातील युवकांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत दाखल झालेले बोल्हेगावचे सामाजिक कार्यकर्ते अविनाश भिंगारदिवे यांना बोल्हेगाव विभागप्रमुखपदी व मंगलगेट येथील अक्षय भिंगारे यांची शिवसेना उपशहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.
शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव यांनी पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करुन नवनिर्वाचित पदाधिकारी भिंगारदिवे व भिंगारे यांना नियुक्तीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता विभागाचे उपजिल्हा प्रमुख ओंकार शिंदे, स्वप्निल खाडे, राहुल जाधव, सागर मंदुलकर, शुभम खरात, आकाश पाटोळे, श्याम भिंगारदिवे, फिरोज पठाण, सचिन उघाडे, प्रफुल वाघमारे, विशाल मोरे, शुभम किर्टे, अक्षय मरकड, सचिन वाघमारे, युवराज ढाकणे, अजय कदम, पृथ्वीवरा विटेकर, अमन लोखंडे, प्रशांत भंडारे, नंदू बेद्रे, महेश बेद्रे, वैभव काळे, रोहित पाथरकर, अभिजीत राहिंज, रवी वाडेकर, दिनेश शिंदे, अक्षय चव्हाण, विकी काळे आदी उपस्थित होते.
शहर प्रमुख सचिन जाधव म्हणाले की, शहरात नव्या दमाने शिवसेनेची बांधणी सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकासात्मक कार्याला प्रेरित होऊन मोठ्या संख्येने युवक शिवसेनेत दाखल होत आहे. सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका शिवसैनिकांची राहिली असून, राज्य सरकारच्या माध्यमातून गोरगरिबांचे व विशेषत: युवकांचे प्रश्न सोडविली जात आहे. महिलांना देखील लाडकी बहिणीच्या माध्यमातून सन्मान देऊन सक्षम करण्याचे काम राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे. युवकांची शहरात ताकद उभी करुन परिवर्तन घडविणार असल्याची भूमिका मांडली. तर युवा वर्ग शिवसेनेते मोठ्या संख्येने दाखल होत असून, विधानसभेच्या तोंडावर शहरात युवा शिवसैनिकांची मोठी फळी निर्माण केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरात शिवसेना पक्षाच्या ध्येय, धोरणाप्रमाणे काम करुन, पक्ष बळकट करण्याचे काम केले जाणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.
नगर शहरात बोल्हेगाव व मंगलगेट भागातील युवकांचा शिवसेनेत प्रवेश
- Advertisement -