Tuesday, February 18, 2025

प्रमोद कांबळे यांच्या संकल्पनेतून साकारले ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज तोरण’ Video

प्रमोद कांबळे यांच्या संकल्पनेतून साकारले श्री छत्रपती शिवाजी महाराज तोरण
कोल्हापूर येथे माजी खा.संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते अनावरण

नगर : नगरमधील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रशिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या संकल्पनेतून गाडीत लावण्यासाठी तसेच घरात लावण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज तोरण तयार करण्यात आले आहे. पूर्णत: हस्तनिर्मित या तोरणाचे अनावरण कोल्हापूर येथे माजी खा.संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी प्रमोद कांबळे, यल्लप्पा स्क्रिनचे यल्लप्पा द्यावनपेल्ली, व्यंकटेश द्यावनपेल्ली आदी उपस्थित होते. संभाजीराजे छत्रपती यांनी शिवछत्रपतींचे तोरण पाहून आनंद व्यक्त करीत कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले. तोरण संकल्पना, त्याचे डिझाईन आणि निर्मिती अतिशय सुंदर झाल्याचे त्यांनी आवूर्जन म्हटले.
प्रमोद कांबळे यांनी सांगितले की, अनेकदा गाड्यांमध्ये विविध रंगांचे तोरण सजावटीसाठी लावलेले आपण पाहतो. घरातही असेच रंगीबेरंगी तोरण लावलेले असतात. यामागे एक मंगल भावना असते. यावरुन सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची चित्र असलेले तोरण साकारण्याची संकल्पना मनात आली. त्याचे डिझाईन तयार करून ते यल्लप्पा द्यावनपेल्ली यांच्याकडे सुपुर्द केले. स्क्रिन प्रिंटिंग क्षेत्रात मोठा अनुभव असलेल्या द्यावनपेल्ली यांनी जवळपास दोन वर्षे मेहनत घेऊन अतिशय सुरेख तोरण साकारून या संकल्पनेला मूर्त रूप दिले आहे. युवराज संभाजीराजे छत्रपतीही हे तोरण पाहून खूप आनंदीत झाले तेव्हा खूप समाधान लाभले.
यल्लप्पा द्यावनपेल्ली यांनी सांगितले की, प्रमोद कांबळे यांच्या संकल्पनेतून तोरण तयार करताना कॉटन, कॅन्व्हासचा वापर केला. एम्बोसिंग स्क्रिन प्रिंटिंग केले. तोरणाची संपूर्ण शिलाई हाताने केली जाते. तोरणावर छत्रपतींचे चित्र, राजमुद्रा, ढाल तलवार, ओम, जय भवानी, जय शिवाजी ही अक्षरे आणि स्वराज्याचा भगवा झेंडा आहे. मराठीसह इंग्रजी, गुजराती, पंजाबी, बंगाली, ओडिया, कन्नड, तेलुगु, मल्याळम, तामिळ अशा विविध भाषांमध्ये तोरण साकारले आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाला तोरण घेताना मनापासून अभिमान वाटेल. तोरणासाठी आकर्षक बॉक्स पॅकिंगही तयार करून घेतलेले आहे. सदर तोरण सर्वांना यल्लप्पा स्क्रिन, दुकान नं.8, अमित अपार्टमेंट, गाडगीळ पटांगण, नालेगाव येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – 9822429421/8975025833

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles