Wednesday, April 17, 2024

लंकेच्या जनसंवाद यात्रेला संजय राऊत येणार म्हणजे नगर दक्षिणेचा निकालच लागणार… शिवाजीराव कर्डिले यांचा टोला…

महाविकास आघाडीचे नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार निलेश लंके हे सोमवारी पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी गडावरून आपल्या प्रचाराचा शुभारंभ करत आहेत.

या यात्रेच्या शुभारंभाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी अंकुश काकडे यांची उपस्थिती असणार आहे. मात्र संजय राऊतांच्या उपस्थितीवरून भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांनी जोरदार टीका केली आहे.

शिवाजी कर्डिले म्हणाले की, निलेश लंके हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उभे राहिले आहेत. त्यामुळे नेत्यांच्या त्यांच्या प्रचाराला यावे लागणार आहे. परंतु संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. संजय राऊत ज्या ठिकाणी जातात त्याठिकाणच्या उमेदवाराला 100 टक्के अपयश येते. ते जर उद्या निलेश लंके यांच्या जनसंवाद यात्रेला येणार असतील तर अहमदनगर दक्षिणचा निकाल उद्याच लागला असं समजावं, अशी टीका त्यांनी संजय राऊतांवर केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles