अहमदनगर -एम आय एम पक्षाचे माजी आमदार वारिस पठाण यांचा पुतळा जाळल्याच्या गुन्ह्यातून आरोपींची निर्दोष मुक्तता
एमआयएम पक्षाचे माजी आमदार वारिस पठाण यांनी कर्नाटक राज्यामध्ये हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या जातील असे वक्तव्य केल्याने अहमदनगर शहर शिवसेना पक्षाच्या वतीने निषेध म्हणून चितळे रोड या ठिकाणी आमदार वारिस पठाण यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्या बाबत तोफखाना पोलीस स्टेशन येथे माजी आमदार अनिल भैया राठोड, दिलीप सातपुते, मदन आढाव ,दत्तात्रय कावरे, योगीराज गाडे आणि संग्राम कोतकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचं चौकशी होऊन तोफखाना पोलिसांनी आरोपींविरुद्ध दोषारोप पत्र अहमदनगर येथील न्यायालयात दाखल केलेले होते दरम्यानच्या काळात माजी आमदार अनिल भैया राठोड यांचे करोना ने निधन झाल्यानंतर उर्वरित आरोपींविरुद्ध खटला चालवण्यात आला. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाला आरोपींविरुद्ध कोणताही सबळ पुरावा सिद्ध न करता आल्याने ८वे, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती ए.ए.शिरवळकर यांनी आरोपींना
दिनांक 15 /5/ 2024 रोजी सदर खटल्यातून निर्दोष मुक्त केलेले आहे. सदर खटल्यामध्ये आरोपींतर्फे एडवोकेट समीर पटेल यांनी कामकाज पाहिले व त्यांना एडवोकेट सलमान जहागीरदार यांनी सहकार्य केले.