विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर त्याचे पडसाद राज्यभर आता उमटू लागले आहेत. नगर शहर शिवसेनेच्यावतीने नार्वेकर यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी नार्वेकरांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी युवासेनेचे राज्यसहसचिव विक्रम राठोड, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, उपजिल्हाप्रमुख भगवान फुलसौंदर, शहर प्रमुख संभाजी कदम, महिला आघाडीच्या स्मिता अष्टेकर नगरसेवक बाळासाहेब बोराटे, सचिन शिंदे, दत्ता जाधव, उपशहर प्रमुख संदीप दातरंगे, पप्पू भाले यांच्यासह शिवसैनिक उपदाधिकारी यावेळी उपस्थित होते. नेताजी सुभाष चौकामध्ये भाजपाच्या विरोधात व विधानसभाअध्यक्ष नार्वेकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. गद्दारांचे करायचे काय खाली डोके वरती पाय, एकतर्फी निर्णय देणाऱ्या नार्वेकरांचा धिक्कार असो यासह ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. तसेच नार्वेकर यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारण्यात आले.