Friday, January 24, 2025

शिवसेना शिंदे गटाची नगर तालुक्यात मोर्चेबांधणी….ठाकरे गटासमोर आव्हान

नगर –
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी प्रखर हिंदुत्वाचे विचार तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत तसेच मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना स्थापन केली होती. आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या संकल्पनेतील गाव तिथे शाखा उपक्रमाचा सुरुवात केली आहे. चिचोंडी पाटील गावात येण्याचा अनेकदा योग आला. हिंदुत्वासाठी आयुष्यभर काम करत आलो आहे यापुढेही काम करत राहणार असून माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब हे सुद्धा कणखर हिंदुत्वाच्या विचारांसाठीच काम करत आहेत. अनेक जण आमच्यावर टीका करत असतात की आम्ही खोके घेऊन बाहेर पडलो परंतु मंत्री पदासाठी संघटनेतील पदांसाठी कुणी किती खोके घेतले हे विचारायची वेळ आता आली आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी करिता दिवस रात्र झटत असल्याचे प्रतिपादन नगर तालुकाध्यक्ष अजित दळवी यांनी केले.
नगर जिल्हा शिवसेनेच्या वतीने नगर तालुक्यातील चीचोंडी पाटील, भातोडी, आठवड या गावात शिवसेनेच्या शाखा उद्घाटनांचा कार्यक्रम पार पडला यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबू शेठ टायरवाले शिवसेनेचे नगर शहर प्रमुख दिलीप सातपुते युवा सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अमोल हुंबे, नगर तालुकाध्यक्ष अजित दळवी,आनंदराव शेळके, दामोदर भालसिंग, महेश लोंढे, डॉक्टर गाडे, बाजीराव हजारे, प्रल्हाद जोशी, मनोज कोकाटे, पोपट पाथरे, विनोद शिरसाठ, अशोक कोकाटे, दीपक हजारे, संकेत काळे, सचिन ठोंबरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहर प्रमुख दिलीप सातपुते म्हणाले की आज पाचशे वर्षांचे स्वप्न पूर्ण होत असून अयोध्येत हिंदूंचा आराध्य दैवत पुन्हा एकदा विराजमान झाले आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वांचे विचार स्वप्न मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी आत्मसात केले असून ते आज त्याच कर्तव्य पथावर कार्यरत आहेत सर्वसामान्य माणूस जेव्हा मोठ्या पदावर जातो तेव्हाच सर्वसामान्यांचा विकास साधला जातो. शासन आपल्या दारी ही संकल्पना आणून मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्यांच्या दारात प्रशासनाला घेऊन आले आहेत त्यामुळे वर्षानुवर्ष अडकलेली प्रलंबित सर्वसामान्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होत असल्याचे भावना अनेकांनी व्यक्त केली. सामाजिक सुरक्षातेसाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे. शिवसेनेची मूळ संकल्पना गाव तिथे शाखा ही संकल्पना पुन्हा कार्यवाहीत केले आहे. आज प्रभू रामचंद्रांच्या मुहूर्तावर या संकल्पनेची सुरुवात करीत आहोत. वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी संघर्ष आणि जिद्दीने हा पक्ष उभारला असून आत्ताचे प्रमुख हे पदाधिकाऱ्यांनाच भेटत नव्हते तर कार्यकर्त्यांना कधी भेटायचे अनेक वेळा महत्त्वाच्या कामांसाठी त्यांना भेट घेण्याची मागणी केली असता सहा महिन्यांनी भेटीचा वेळ मिळत असेल तर सर्वसामान्यांची कामे आम्ही कधी करणार असा प्रश्न नेहमी उपस्थित राहत होता त्यामुळे आम्ही आमच्यासह महाराष्ट्रातील असंख्य शिवसैनिकांना एक आशेचा किरण म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मिळाले आणि शिवसेनेचे कामे झपाट्याने मार्गी लागत गेले. नगर शहरातील केडगाव हत्याकांडावेळी एकनाथ शिंदे यांनी पहाटे चार वाजता संपर्क साधून घटनेची सविस्तर माहिती घेऊन प्रशासकीय पातळीवरील सूत्रे हलवली. त्यावेळचे आमचे संपर्कप्रमुख दुसऱ्याच्या कानाला जास्त लागायचे सर्वसामान्य शिवसैनिकांचा प्रश्न त्यांच्या अडचणी हे ऐकून घेण्यापेक्षा त्यावेळचे संपर्कप्रमुखांनी इतर पक्षातील लोकांना जास्त महत्त्व देऊन पक्ष संपवण्याचे काम केले. आज एकनाथ शिंदे मूळ शिवसेना पक्षाला पुन्हा एकदा बळ देण्याचे काम केले असून तळागाळातील शिवसैनिक शिंदे साहेबांच्या पाठीमागे खंबीर उभा आहे.
नगर तालुक्यातील सर्व ग्रामस्थांना शिवसेनेचे वतीने प्रभू श्री रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर मिठाईवाटप करून सर्वांचे तोंड गोड करण्यात आले शिवसेनेचे संस्थापक हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे अयोध्या येथे प्रभू श्रीरामाचे मंदिर बांधण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे जल्लोष करण्यात आला व यावेळी आभार प्रदर्शन शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले यांनी केले

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles