अहमदनगर शहरातील मार्केट यार्ड मधील गाळ्या बाबत न्यायालयाने नुकताच निकाल दिला असून अनधिकृत गाळे पाडण्याचे आदेश दिले आहेत त्या गाळया बाबत आता चांगलेच राजकारण तापले असून काल व्यापाऱ्यांनी मार्केट यार्ड मध्ये आंदोलन करत शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांचा निषेध केला होता. तर नगर शहरात शिवसेनेचे शहर अध्यक्ष दिलीप सातपुते,नगरसेवक योगीराज गाडे,माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी पत्रकार परिषद घेऊन या गाळया बाबत भूमिका स्पष्ट केली आहे. ज्या गाळे धारकांनी काल आंदोलन केले त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर आंदोलन न करता ज्या लोकांनी त्यांना फसवले त्यांच्या कार्यालय समोर जाऊन आंदोलन केले असते तर आम्ही त्यांच्या सोबत उभा राहिलो असतो आणि यावेळी व्यापाऱ्यांच्या वतीने बोलताना राजेंद्र चोपडा यांनी न्यायालयाचा आदेशाचा अवमान केला असून आमच्यावर जे आरोप केले आहे त्या बाबत गुन्हा दाखल करणार आहोत तसेच न्यायालयात या बाबत आम्ही कायदेशीर कारवाई करणार असल्याचं शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी सांगितले आहे.
यावेळी संदेश कार्ले, शरद झोडगे, बाळासाहेब हराळ, रामदास भोर ,योगीराज गाडे ,अमोल येवले, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल महाराज कोतकर राजेंद्र भगत उपस्थित होते