Wednesday, November 29, 2023

अहमदनगर जमिनीच्या वादातुन गोळीबार ; फिर्यादीच निघाला आरोपी

अहमदनगर -श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे येथे जमिनीच्या वादातुन झालेल्या गोळीबार प्रकरणात फिर्यादी सुनील राजू गायकवाड (वय-३०, रा. चिंभळे, ता. श्रीगोंदा) हाच आरोपी निघाला असून बेलवंडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. जखमी संतोष उर्फ लाला गायकवाड यांच्या जबाबावरून बेलवंडी पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती समजली.

जयदीप सुरमकर याने जमिनीच्या वादातून संतोष उर्फ लाला गायकवाड यांच्यावर पिस्टलमधून सहा गोळ्या झाडल्याची घटना १० ऑक्टोबर रोजी घडली. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी जयदीप सुरमकर व त्याचा साथीदार सचिन उर्फ चिंग्या भागवत याला बेलवंडी पोलीस अटक केली. या प्रकरणात फिर्यादी सुनील गायकवाड याचा सहभाग असण्याचा पोलिसांना संशय होता. त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू होता.

नुकताच पोलिसांनी जखमी संतोष गायकवाड यांचा जबाब घेतला. फिर्यादी सुनील गायकवाड, हल्लेखोर जयदीप सुरमकर व त्याचा साथीदार सचिन उर्फ चिंग्या सोपान भागवत या तिघांनी मिळून गोळीबार घडवून आणल्याचे जखमी गायकवाड यांनी त्या जबाबामध्ये म्हटले आहे. जखमी संतोष गायकवाड यांच्या जबाबावरून बेलवंडी पोलिसांनी फिर्यादी सुनील राजू गायकवाड याला आज(दि.२०) संध्याकाळी अटक केली आहे. दरम्यान, चिंभळे गोळीबार प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक मोहनराव गाजरे यांनी बारकाईने तपास करीत तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: