Tuesday, June 25, 2024

Ahmednagar…बुलेटसह मोटारसायकल चोरणारी टोळी जेरबंद…’एलसीबी’ची कामगिरी

५ बुलेट मोटारसायकलसह एकुण 10 मोटारसायकल चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद
11,70,000/- रुपये किमतीच्या मोटारसायकली हस्तगत.
—————————————————————————————————————-
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोटारसायकल चोरीच्या वारंवार घटना घडत असल्याने मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना अहमदनगर जिल्ह्यातील मोटारसायकल चोरी करणारे आरोपींची माहिती काढुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, रविंद्र कर्डीले, फुरकान शेख, रोहित मिसाळ, भाऊसाहेब काळे, आकाश काळे, विशाल तनपुरे, अमोल कोतकर, संतोष खैरे, उमाकांत गावडे, संभाजी कोतकर यांचे पथक नेमुन गुन्हे उघडकिस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या.
सदर सुचना प्रमाणे पथक अहमदनगर जिल्ह्यामधील मोटारसायकल चोरी करणारे आरोपींची माहिती काढत असतांना दिनांक 30/05/2024 रोजी पोनि श्री दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गुप्त बातमीदारामार्फत तीन इसम चोरीचे विनानंबरचे एच. एफ. डिलक्स मोटारसायकलवरुन श्रीगोंदा बायपास येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोनि श्री दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन कारवाई करणेबात सुचना दिल्या होत्या. सदर सुचनांप्रमाणे पथकाने तात्काळ श्रीगोंदा बायपास या ठिकाणी सापळा लावुन थांबले असता बातमीतील नमुद इसम एका विनानंबरचे एच.एफ. डिलक्स मोटारसायकलवरुन येतांना दिसल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) अनिल मोतीराम आल्हाट वय – 23 वर्षे रा. श्रीगोंदा, 2) हर्षद किरण ताम्हाणे वय – 18 वर्षे रा. श्रीगोंदा, 3) निखील उद्धव घोडके वय -18 वर्षे रा. श्रीगोंदा जि.अहमदनगर असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे मिळुन आलेल्या विनानंबरचे मोटारसायकलबाबत त्यांना विश्वासात घेवुन विचारपुस करता त्यांनी सदरची मोटारसायकल चोरी करुन आणलेली असल्याचे सांगितले. त्यानुसार ताब्यातील आरोपींकडे त्यांनी आणखी इतर मोटारसायकल चोरी केल्या आहेत काय याबाबत तपास करता त्यांचेकडुन खालीलप्रमाणे 11,70,000/- रुपये किमतीच्या 10 मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.

अ.नं. मोटार सायकल कंपनी चेसी नंबर इंजिन नंबर
1 हिरो कंपनीची एच. एफ. डिलक्स MBLHA11EPB9F01107 HA11EDB9F03313
2 रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट ME3U3K5C0BK095361 U3K5COBK095361
3 रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट ME3U3S5C1EL113159 U3S5C0EL577952
4 रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट ME3U3S5C1HC824089 U3S5C1HC501875
5 रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट ME3U3S5C0EE461890 U3S5C0EE461890
6 रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट ME3U3S5C2KM786323 U3S5C2KM723181
7 सुझुकी ऍ़क्सेस MB8DP11ABK8B83804 AF216037408
8 यामाहा कंपनीची सॅल्युटो ME1RE1228F0014068 E3P1E0035869
9 हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर 04L16F44312 04L15E43460
10 होंडा कंपनीचे युनिकॉर्न ME4KC315HKA123592 KC31EA1123621

ताब्यातील आरोपीकडुन अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीचे खालीलप्रमाणे 07 गुन्हे उघडकीस आले आहेत.
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. तोफखाना 188/2024 भादवि कलम 379
2 नगर तालुका 345/2024 भादवि कलम 379
3 नगर तालुका 433/2024 भादवि कलम 379
4 कर्जत 352/2024 भादवि कलम 379
5 कर्जत 353/2024 भादवि कलम 379
6 लोणीकंद, पुणे 452/2024 भादवि कलम 379
7 विश्रांतवाडी, पुणे 93/2024 भादवि कलम 379

ताब्यात घेण्यात आलेले आरोपी नामे 1) अनिल मोतीराम आल्हाट वय – 23 वर्षे रा. श्रीगोंदा, 2) हर्षद किरण ताम्हाणे वय – 18 वर्षे रा. श्रीगोंदा, 3) निखील उद्धव घोडके वय -18 वर्षे रा. श्रीगोंदा जि.अहमदनगर यांना तोफखाना पोलीस ठाणे गु.र.नं. 188/2024 भादवि कलम 379 प्रमाणे या गुन्ह्याचे तपासकामी तोफखाना पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास तोफखाना पोलीस ठाणे हे करीत आहेत. सदर आरोपींकडुन आणखी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर, मा. श्री. अमोल भारती साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles