Saturday, October 5, 2024

श्रीगोंदा- नगर मतदार संघात येणार नवा ट्वीस्ट,डॉ. प्रणोती जगताप म्हणाल्या..विधानसभेसाठी आता

नगर-आगामी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीत श्रीगोंदा – नगर मतदार संघातून माजी आ. राहुल जगताप यांची उमेदवारी निश्चित असून त्यांच्या पाठीमागे महिलांनी खंबीरपणे उभे रहावे. विधानसभेसाठी आता आमच ठरलयं ! मागील पाच वर्षात रखडलेली विकास कामे मार्गी लावण्यासाठी तुमची साथ महत्वाची असून आता तुम्हीही ठरवा अशी साद डॉ. प्रणोती राहुल जगताप यांनी महिलांना घातली. त्यामुळे राहुल जगताप पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या मतदार संघात येणार नवा ट्वीस्ट येणार आहे.

नगर तालुक्यातील वाळकी येथील शिवनेरी सांस्कृतिक भवनामध्ये आयोजित केलेल्या हळदी कुंकु कार्यक्रमात उपस्थित महिलांशी संवाद साधताना डॉ. प्रणोती जगताप बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या संगिता निमसे, पंचायत समितीच्या मा. सदस्या ताराबाई कासार, धर्मराज शैक्षणिक संस्थेच्या संचालक कविता कासार, अश्विनीताई देशमुख, शितलताई शिर्के, श्रृतिका निमसे, अंजली धोंडे, योगिता मुरुमकर, कविता दळवी, शोभा लोखंडे आदींसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना डॉ. प्रणोती जगताप यांनी महिलांना आरोग्य कसे सांभाळावे या विषयी मार्गदर्शन करताना संतुलित आहार ही आज काळाची गरज बनली असून बदलल्या आहार पद्धतीमुळे मानसिकता बदलत चाललीय असे म्हटले. यावेळी राजकीय भाष्य करताना मागील विधानसभा निवडणूकीत काही कारणास्तव राहुल जगताप यांनी उमेदवारी केली नाही. त्यामुळे मतदार संघ ५ वर्षे मागे गेला. तुम्हीच सांगा मागील पाच वर्षात वाळकी गटात कोणती विकास कामे झाली? असा प्रश्न उपस्थित केला. पाच वर्षातील रखडलेली विकास कामे मार्गी लावण्यासाठी पुन्हा विधानसभेच्या मैदानात राहुल जगताप उतरणार असल्याचे आता ठरले आहे. महिलांनीही आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे अशी साद महिलांना घातली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles