Thursday, July 25, 2024

Ahmednagar crime news: किरकोळ कारणावरून एकाचा खून

ओळखीच्या मित्राला वापरायला दिलेला होम थेटर स्पीकर का आणून दिला नाही. याबाबत विचारणा करण्यास गेलेेल्या एकावर हातातील कटरने गळ्यावर डाव्या बाजुने वार करुन तसेच लाकडी दांडक्याने डोक्यावर मारुन खून केल्याची घटना घडली आहे. रमेश गायकवाड (वय 31), रा.वडारवाडा गोंधवणी श्रीरामपूर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आकाश बबन डमके उर्फ डंग्या रा.गोंधवणी श्रीरामपूर यांच्या विरोधात श्रीरामपूर पोलीस ठाण्यात शेखर राजू गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, दि. 18 जून रोजी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास म्हसोबा मंदीरा शेजारी, गोंधवणी वॉर्ड नं.1 श्रीरामपूर येथे माझा चुलत भाऊ रमेश गायकवाड हा त्याच्या ओळखीचा आकाश बबन ढमके उर्फ डंग्या (रा. गोंधवणी) यास रमेश याने घरातून दिलेला होम थेटर स्पीकर का आणून दिला नाही याबाबत विचारणा करण्यास गेला असता आकाश बबन ढमके उर्फ डंग्या याने जीवे ठार मारण्याचे उद्देशाने त्याच्या हातातील कटरने रमेश गायकवाड याच्या गळ्याच्या डाव्या बाजुने वार करुन तसेच लाकडी दांडक्याने त्याच्या डोक्यात मारुन जखमी केले आहे.

यावेळी शेखर राजू गायकवाड याने जखमी रमेशला उपचारासाठी लोणी येथे दाखल केले. मात्र, जखमीवर उपचार सुरू असताना रमेश गायकवाड यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शेखर गायकवाड यांच्या फिर्यादीवरून आकाश बबन डमके उर्फ डंग्या यांच्या विरोधात भा.दं.वि कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई समाधन सोळंके हे करत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles