Monday, July 22, 2024

अहमदनगर आठ महिन्यांत नऊ लग्न करणारे सिमरन टोळी जेरबंद, लग्न करून तरुणांकडून उकळले लाखो रुपये

श्रीगोंदा प्रतिनिधी बनावट लग्न करुन लग्नाळू मुलगा व त्यांच्या नातेवाईकांची फसवणूक करणारी यवतमाळ येथील आंतरराज्यीय टोळी श्रीगोंदा पोलिसांनी जेरबंद केली असून बनावट नवरीसह इतर चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल १३ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की नवरदेव नितीन अशोक उगले (वय ३१ वर्षे) रा. मुगुंसगाव ता.श्रीगोंदा याचा विवाह बनावट

नवरी सिमरन गौतम पाटील हिच्याबरोबर २ लाख १५ हजार घेऊन विवाह करण्याचे ठरवून देण्यात आले. कोर्टासमोर बनावट नवरीच्या आईने मुलाच्या आईच्या डोळ्यात शिवीगाळ करत मिरची पूड टाकून चारचाकी गाडीने पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. यावेळी मुलाच्या घरच्यांनी बनावट नवरीला पकडुन ठेवले होते. याबाबत नितिन उगले यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. बाकीच्या आरोपींना पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर बीत अंमलदार मुकेशकुमार बढे व पथकाने यवतमाळ येथे जाऊन कारवाई केली.

आरोपी श्रीमती आशा गौतम पाटील (वय ३८) रा. चोरंबा ता. घाटंजी जि. यवतमाळ सिमरन गौतम पाटील (वय १९) रा. चोरंबा ता. घाटंजी जि. यवतमाळ, शेख, शाहरुख शेख फरीद (वय ३२) रा. चोरंबा ता. घाटंजी जि. यवतमाळ, दिपक पाडुरंग देशमुख (वय २६) रा.चोरंबा ता. घाटंजी जि. यवतमाळ, अर्जुन रामराव पाटील उर्फ कर्णन गौतम पाटील (वय २४) रा. चोरंबा ता. घाटंजी जि. यवतमाळ, सचिन बलदेव राठोड उर्फ राज रामराव राठोड (वय ३७ वर्षे) रा वरुड ता. पुसद जि. यवतमाळ व युवराज नामदेव जाधव (वय ३३ वर्षे) रा. नंदपुर मोहा ता, पुसद जि. यवतमाळ यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यातील फसवणुक केलेली रोख रक्कम व गुन्हयात वापरलेल्या चारचाकी गाड्या असा एकुन मुदेमाल १३ लाख ७८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असुन आरोपींना न्यायालयाने ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.ही कारवाई पोलीस अध-ीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, श्रीगोंदा शहर बिट अंमलदार मुकेशकुमार बडे, मदतनिस प्रविण गारुडकर, आनंद मैड, संभाजी गर्जे, अरुणा खेडकर, आस्मीता शेळके-खेतमाळीस यांनी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles