आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्यात येत आहे. शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावरही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. सदाशिव लोखंडे यांनी शिर्डीतून पुन्हा उभं राहुन दाखवावंच, या शब्दांत उद्धव ठाकरेंनी दमच भरला आहे. सोनईत आयोजित सभेत ते बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, शिर्डीचे खासदार खासदार तर तिकडे शिंदे गटात पाणी भरण्यासाठी गेलेच आहेत. आता तुम्ही उभं राहुन दाखवाच नव्हे तर भाजपने भ्रष्ट नेते आमच्या उमेदवारांसमोर उभं करुन दाखवावंच, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचं नाव घेता दम भरला आहे. तसेच राज्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांचे पंचनामे हे सरकार करू शकत नाही.
पिकविमा भरले मात्र, शेतकऱ्यांच्या हातात काही मिळाले नाही. जिथे जाऊ तिथे खाऊ असा मोठ्या प्रमाणात सत्ताधाऱ्यांकडून घोटाळा सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना असं वाटतं असेल की मोठे नेते फोडले की फायदा होईल हे तुम्हाला शोभत नाही. मोदी राज्याला देत काही नाही मात्र उद्योग धंदे इथून पळवून नेत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.क