दक्षिण लोकसभेची जागा काँग्रेस पक्षचं लढविणार
सौ.मंगल भुजबळ
अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिण लोकसभेची जागा कॉंग्रेस पक्ष लढविण्याच्या तयारीत असल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी कॉंग्रेस च्या राष्ट्रीय समन्वयक मंगल भुजबळ यांनी दिली आहे. आपण काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे ओबीसींची संख्या जास्त असलेल्या मतदासंघात कॉंग्रेस ने जागा लढवाव्यात अशी मागणी 2 महिन्यांपूर्वी केली होती व त्याचा सतत पाठपुरावा देखील केला होता त्यानुसार त्यासंदर्भात 5 जानेवारी ला दिल्ली येथे 24,अकबर रोड कॉंग्रेस कार्यालयात राष्ट्रीय ओबीसी कार्यकारिणीची आढावा बैठक राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व ओबीसी राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन अजयसिंह यादव साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमधे होणार आहे.त्या बैठकीत महाराष्ट्रातील ओबीसींची संख्या जास्त असलेल्या 6 लोकसभा मतदारसंघातील अहवाल मागविला गेला असून त्या लोकसभा मतदारसंघावर चर्चा करून ते मतदासंघ लक्ष केंद्रित करून त्या जागा कॉंग्रेस ने लढविण्याची रणनीती आखली जाणार आहे. महाराष्ट्रातील ओबीसी संख्या जास्त असलेल्या 6 लोकसभा मतदासंघात अहमदनगर दक्षिण लोकसभेचा समावेश असून दक्षिण लोकसभेच्या माहितीचा अहवाल रिपोर्ट मागविला गेला आहे.या 6 लोकसभेच्या माहितीच्या अहवालाच्या रिपोर्टच्या प्रती या नवी दिल्ली येथे कॉंग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब ,खासदार राहूलजी गांधीं ,कॉंग्रेस नेत्या सोनियाजी गांधीं ,राष्ट्रीय महासचिव के सी वेणुगोपाल साहेब ,राष्ट्रीय ओबीसी,एससी ,एसटी प्रभारी के राजु साहेब व राष्ट्रीय कॉंग्रेस ओबीसी अध्यक्ष कॅप्टन अजयसिंह यादव साहेब यांना दिल्या जाणार असून *जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा हे स्लोगन रिपोर्ट ला लावुन रिपोर्टचे प्रेज़ेंटेशन दिल्ली येथे केले जाणार आहे.
*”अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे अस्तित्व टिकविण्यासाठी व पक्षाचे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक ही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने आता पक्षश्रेष्ठींनी सुध्दा यात लक्ष घातले असल्याचे भुजबळ यांनी सांगितले .
मागील 5 वर्ष जिल्ह्यात नेते व पदाधिकारी पक्ष संघटना बांधणीचे काम करत आहेत त्याशिवाय पक्षआदेशानुसार आंदोलने ,मोर्च ,मेळावे यांचे देखील आयोजन करून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचा पदाधिकारी यांनी कॉंग्रेस पक्ष्याच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे हे सर्व आयोजन करताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये काँग्रेस ,पदाधिकारी ,कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने आपली मोठी शक्ती संघटना बांधणीसाठी वापरली आहे. या पार्श्वभूमीवर पदाधिकारी ,कार्यकर्ते यांना ताकद देण्यासाठी जिल्ह्यातील दक्षिण लोकसभेची जागा काँग्रेस पक्षचं लढवील यावर पक्षश्रेष्ठी सुध्दा ठाम आहेत. कॉंग्रेस विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्या नेतृत्वात दक्षिण लोकसभा कॉंग्रेस ला जिंकणं फार अवघड नाही तसेच या मतदासंघात राष्ट्रवादीचा 1999 ते 2019 या काळात एक टर्म सोडली तर सातत्यानं पराभूत होत असल्याने यावेळेस ही जागा कॉंग्रेसला सोडल्यास कॉंग्रेस विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात साहेबांच्या नेतृत्वात ही जागा कॉंग्रेस पक्ष नक्कीच जिंकेल असा ठाम विश्वास असल्याचे भुजबळ यांनी सांगितले .