Tuesday, December 5, 2023

श्री मच्छिंद्रनाथांना चढवला तब्बल ५०४ पदार्थांचा नैवद्य; काय आहे वैशिष्ट्ये?

अहमदनगर : नगर शहारातील नावाजलेला परिसर असणाऱ्या नालेगावात गेल्या सातशे वर्षापासून एक छोटा पिर होता. अनेक जण त्या पिराची मनोभावे सेवा करत असे. यातीलच ७ तरुणांनी एकत्र येत या पिराचा जीर्णद्धार केला. अल्पावधीच श्री मच्छिंद्रनाथ देवस्थान म्हणून नावारूपाला आले. दर गुरुवारी असंख्य नाथयोगी येथे दर्शनासाठी अलोट गर्दी करतात.
बाबांच्या प्रकट दिन व ऋषीपंचमी निम्मित तब्बल ५०४ पदार्थांचा नैवेद्य नाथांना दाखवण्यात आला. या नैवेद्याचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व घरगुती पद्धतीने प्रत्येकाने एक – एक पदार्थ या ठिकाणी नैवेद्य म्हणून आणले होते. कुठलाही पदार्थ या ठिकाणी एकसारखा आणला नव्हता. प्रत्येक पदार्थ हा वेगवेगळा होता. या सोबतच या ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते.

भात-भाजी, गोड शिरा असे या महाप्रसाराचा स्वरूप होते. देवाच्या आरतीनंतर हा संपूर्ण नैवेद्य आणलेल्या भाविकांमध्ये महाप्रसाद म्हणून वाटण्यात देखील आला. या देवस्थानाचे भरत शेळके हे इथले देवस्थानचे पुजारी आहेत .

नातं संप्रदायाबद्दल जे समज गैरसमज आहेत, त्याबद्दल त्यांनी अधिक माहिती दिली. महिलादेखील नाथांची आराधना करू शकतात. त्यादेखील नाथांच्या या सेवेत सहभागी होऊ शकतात असं म्हणून येथे महिलांना विशेष मान देखील दिला जातो. या कार्यक्रमासाठी महिला देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d bloggers like this: